HW News Marathi
Uncategorized

शहीदांच्या कुटुंबाला आर्थिक मदत तर एका व्यक्तीला सरकारी नोकरी

मुंबई । राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प हा २७ फेब्रुवारी रोजी मांडला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. राज्य सरकार पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य जाहीर करणार असून त्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय देखील सरकारने घेतला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी मांडलेले काही मुद्दे

– राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प २७ फेब्रुवारी २०१९ रोजी मांडला जाईल.

– या अधिवेशनात एकूण ११ विधेयके सादर केली जातील.

– पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांना ५० रूपयांचे सहाय्य राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचा निर्णय सुद्धा सरकारने घेतला आहे. सर्वच शहीदांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे.

– केंद्र सरकारच्या चमूने महाराष्ट्राला भेट देऊन ४७०० कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. एकूण ८२ लाख शेतकर्‍यांपैकी ४२ लाख शेतकर्‍यांच्या खात्यात आतापर्यंत दुष्काळी मदतीची रक्कम जमा झालेली आहे.

– छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ५१ लाख शेतकर्‍यांच्या खात्यांसाठी २४ हजार कोटी रूपये बँकांना देण्यात आले असून, १८ हजार कोटी रूपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आदिवासींचे खावटी कर्ज सुद्धा राज्य सरकारने माफ केले आहे.

– पीकविमा योजनेंतर्गत गेल्या १५ वर्षांत १.२६ कोटी शेतकर्‍यांना २९०० कोटी रूपये लाभ मिळाला तर आता अवघ्या ४ वर्षांत १३,१३५ कोटी रूपये शेतकर्‍यांना प्राप्त झाले आहेत. विविध प्रकारच्या कीडींच्या प्रादुर्भावासाठी सुद्धा ३३३६ कोटी रूपये शेतकर्‍यांना देण्यात आले आहेत.

– एकूण ३ टप्प्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आतापर्यंत २० हजारांहून अधिक गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. चारा, पाणी याची कुठेही कमतरता राहू नये, याची पूर्ण काळजी सरकारतर्फे घेतली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधी देशाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम: शिवसेना

News Desk

कांद्याचे दर गडगडले

News Desk

पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसळधार कोसळणार, हवामान खात्याने दिला Alert

News Desk