धनंजय दळवी | आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि भाजपकडून त्याची जोरदार तयारीही सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्या आधी प्रचार सभेला सुरुवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे १ मार्च रोजी मुंबईत जाहीर सभा घेणार आहेत. मुंबईत राहुल गांधी यांचे स्वागत करणारे बॅनर काँग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी लावले आहेत. परंतु या बॅनरला भारतीय जनता पार्टीने प्रत्युत्तर दिले आहे.
काँग्रेसने शिवसेना भवन बाहेर लावलेल्या बॅनरवर “प्रिय मुंबईकर मी येतोय आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपण आवश्यक या – राहुल गांधी” असा काँग्रेसच्या बॅनरवर लावण्यात आलेले आहे. त्याचाच प्रत्युत्तर म्हणून भाजपने त्याच्याच बाजूला बॅनरबाजी करत “प्रिय, मुंबई कर रहा हू एक मशीन लेकर, एक तरफ से आलू डालेंगे दुसरी तरफ से सोना निकलेंगे,” आशायाचे बॅनर भाजपने लावूव राहुल गांधींच्या दौऱ्याला विरोध केला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय यांनी हा बॅनर लावला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.