HW News Marathi
मनोरंजन

‘पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमामध्ये ‘अमित शहा’च्या भूमिकेत मनोज जोशी

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या सिनेमाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या सिनेमात भाजप अध्यक्ष अमित शहा यांची व्यक्तिरेखा कोण साकारणा यावर अनेक चर्चा रंगल्या होत्या. आता यासर्व चर्चेला पूर्णविराम लागणार आहे. अभिनेते मनोज जोशी हे अमित शहाची भूमिका साकारणार आहे. या भूमिका रुपेरी पड्यावर साकारण्यासाठी मी आनंदी असून या भूमिकेबदल मला विचारणा केल्यानंतर मी एका क्षणाचाही विलंब न लावता होकार कळवला.

तसेच पुढे असे देखील म्हणाले की, या भूमिकेसाठी मी बराच अभ्यास केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मनोज जोशी यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी गुजराती सिनेमा व मालिकांत काम केले आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय हा या सिनेमा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत आहे. ओमांग कुमार या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. ओमांग कुमार यांनी यापूर्वी मेरी कोम, सरबजीत,भूमी यांसारख्या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

गुजरातच्या वेगवेगळ्या लोकेशन्सवर सिनेमाचे शूटींग होणार आहे. विवेक ओबेरॉय, मनोज जोशी यांच्याशिवाय बोमन इराणी, प्रशांत नारायण, बरखा बिष्ट सेनगुप्ता, अक्षत आर सलूजा, अंजन श्रीवास्तव, राजेंद्र गुप्ता, जरीना वहाब हे सगळे यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील. अभिनेत्री बरखा बिष्ट नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांची व्यक्तिरेखा जिवंत करणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याविषयी थोडक्यात…

News Desk

हलव्याच्या दागिन्यांनी सजल्या बाजारपेठा

News Desk

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

News Desk