HW News Marathi
क्रीडा

महाराष्ट्र सरकारकडून नेमबाज राही सरनोबतला पगारच नाही

मुंबई | नेमबाज भारताचे नाव जगभर करणाऱ्या राही सरनोबतला गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्र सरकारने पगार न दिल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. तसेच नेमबाज राही सरनोबत कबड्डीपटू दीपिका जोसेफ आणि नेमबाज पूजा घाटकर यांना राज्य सरकारने या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा पगार दिला नाही.

राही सरनोबत ही राज्यातील उपजिल्हाधिकारी म्हणून सेवेत कार्यरत आहे. परंतु राहीला सराव आणि विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे राहीला कार्यालयात उपस्थित राहता येत नाही. या कारणामुळे २०१७ सालापासून राही सरनोबतचा पगारच थांबविण्यात आला आहे. गेल्या दीड वर्षापासून राहीला तिचा पगार मिळालेला नाही. राहीने रशिया येथील ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राहीने कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर राहीचा महाराष्ट्र सरकारकडून सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी राहीला पुण्यातील उप जिल्हाधिकारी या पदावर रुजू करण्यात आले होते.

भारताची कबड्डीपटू दीपिका जोसेफ विक्रीकर खात्यात सहाय्यक आयुक्त म्हणून सेवेत आहे. दीपिकाचा सुद्धा पगारासंदर्भात आक्षेप आहे. २०१४-२०१५ या कालावधीत दीपिका दुखापतग्रस्त असताना तिला पगार मिळू शकला नव्हता. विक्रीकर खात्याच्याच सेवेत असलेल्या पूजा घाटकरला बिनपगारी रजा घ्यावी लागते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Asia Cup 2018 | विराट ऐवजी रोहित शर्मा करणार नेतृत्त्व

News Desk

Mumbai Marathon 2019 | मुख्य मॅरेथॉनच्या भारतीय गटात आर्मीचे नितेंद्र सिंग रावत विजयी

News Desk

अजिंक्य रहाणेच्या कॅचची क्रिकेट विश्वात चर्चा

News Desk