HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू!

मुंबई | राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू, अशी टीका  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. शरद पवारांनी आज (१३ एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंनी काल (१२ एप्रिल) मनसेच्या उत्तर सभेत शरद पवारांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव कधी घेत नाही, असा सवाल राज ठाकरेंनी उभा केला. यावर शरद पवारांनी राज ठाकरेवर टीकास्त्र सोडले. 

शरद पवार म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी अमरावतीत झाले माझे भाषण बघा, मी २५ मिनिटे छत्रपती शिवाजी महाराजांवर बोललोय, असे ते म्हणाले.  “५-६ महिन्यामध्ये राज ठाकरे एकदाच बोलतात. यामुळे मी शिवरायांचे नाव घेत नाही हा आरोप खोटा असल्याचे त्यांनी सांगितले. शिवरायांचे व्यक्तीमहत्व जिजाईंनी घडवले. बाबासाहेब पुरेंदरेंनी दादाजी कोंडदेवचा उल्लेख केला. याच भूमिकेचा मी विरोध केला, असेही त्यांनी नमूद केले.” “आयएनएस विक्रांतच्या नावाने सोमय्यांनी पैसे कमवले, माझ्या वाचनात आले की, किरीट सोमय्यांनी पैसे गोळा केले. लोकांच्या भावनेला हात घालून पैसे जमवले, मग हे पैसे पक्षाकडे का दिले?, “असा सवालही त्यांनी केला आहे. 

राज ठाकरेंनी सविस्तर वाचन आणि अभ्यास करावा, असा टोमणे शरद पवारांनी मारला. काँग्रेससोबतच्या आघाडीवेळी मी माझी भूमिका एकदम बदलेली नाह, अशीही आठवण त्यांनी पत्रकार परिषदेतून करून दिली. राज ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेने एकही जागा दिली नाही. मी एकाच मंदिरात जातो पण गवगवा करत नाही. राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू असून महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचा प्रयत्न दिसतोय, राज ठाकरे भाषणात भाजपवर एकही शब्द बोलत नाहीत. महागाई, बेरोजगारीचे प्रश्न असताना त्यावर बोलत नाही याचा अर्थ काय? अजित पवारांवरील कारवाईही माझ्यावर कारवाई आहे. पंतप्रधानांना भेटण्यात काय, चूक मी एक खासदार आहे. राज्य सरकार, एसटी संपावर टीका नाही, फक्त मला टार्गेट केले आहे. अॅड गुणरत्न सदावर्तेंनी माझ्याबद्दल द्वेष निर्माण केल्यामुळेच हा हल्ला, असे ही ते म्हणाले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अपयश लपण्यासाठी हा छाती बडवण्याचा प्रकार आहे…

News Desk

शिवसेनेची कोंडी करत राज्यात भाजप-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन

News Desk

“भगवान रामाप्रमाणे भविष्यात मोदींना पुजले जाईल”, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्याचा दावा

News Desk