HW News Marathi
महाराष्ट्र

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी तेलतुंबडेंना अटक

मुंबई | भीमा कोरेगाव हिंसाचार आणि अर्बन नक्षलवाद्याचा संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी डॉ. आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतून आज (२ फेब्रुवारी) अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी मुंबईमध्ये ही कारवाई केली आहे. तेलतुंबडेंवर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे. पुणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी (१ फेब्रुवारी) जामीन नाकारल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तेलतुंबडेंना आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई केली होती. मात्र ‘मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालेलो नाही आणि कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा काहीही संबंध नाही‘, असा दावा करत आनंद तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांच्यावरील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या ३९७३ पशूंची नुकसान भरपाई पशूपालकांच्या खात्यावर जमा

Aprna

उद्धव ठाकरेंशी मतभेद नव्हतेचं ! शरद पवारांचा दावा

News Desk

महावसुली आघाडी सरकारच्या काळातील राजकारणाचे गुन्हेगारीकरण चिंताजनक 

News Desk