मुंबई | दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने (२३ जानेवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकासाठी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. यानंतर लेखिका शोभा डे यांनी यासंदर्भाद ट्विट करून शिवसेना आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “एक नागरिक म्हणून मला १०० कोटी रुपये खर्च करण्याचा अधिकार द्या. मग, पाहा मी कशाप्रकारे या १०० कोटी रुपयांची गुंतवणूक लोकांच्या कल्याणासाठी करते, असे डे यांनी म्हटले आहे. तसेच स्मारके कुणाला हवी आहेत? आम्हाला तर शाळा आणि रुग्णालये पाहिजेत,” असे ट्विट शोभा डे यांनी केले आहे.
Give me a 100 crore grant , and as a citizen i will demonstrate how best to use it for the benefit of people. Who needs more memorials? We need hospitals and schools!
— Shobhaa De (@DeShobhaa) January 23, 2019
दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरेंचे हे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. या गणेशपूजन काल (२३ जानेवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मारकाचे गणेशपूजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार पूनम महाजन, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेनेचे नेते देखील उपस्थित होते.
या स्मारक उभारण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (२२ जानेवारी) झालेल्या बैठकीत घेतला होता. त्यानंतर स्मारक उभारणीसाठी मुंबई पालिकेकडून स्मारक संस्थेला महापौर बंगल्याची जागा भाडेपट्ट्याने देण्यात आली आहे. त्याची कागदपत्रे फडणवीस यांनी बुधवारी (२३ जानेवारी) बाळासाहेबांच्या जयंती दिनी स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.