मुंबई | हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे गणेशपूजन केले आहे. या गणेशपूजन आज (२३ जानेवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मारकाचे गणेशपूजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार पूनम महाजन, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेनेचे नेते देखील उपस्थित होते.
Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis hands over Mayor’s bungalow documents to Bal Thackeray Memorial Trust headed by Shiv Sena Chief Uddhav Thackeray for Bal Thackeray Memorial. pic.twitter.com/QKAozBS6zR
— ANI (@ANI) January 23, 2019
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दादरमधील महापौर बंगल्यात स्मारक उभारण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (२२ जानेवारी) झालेल्या बैठकीत घेतला होता. त्यानंतर स्मारक उभारणीसाठी मुंबई पालिकेकडून स्मारक संस्थेला महापौर बंगल्याची जागा भाडेपट्ट्याने देण्यात आली आहे. त्याची कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (२३ जानेवारी) बाळासाहेबांच्या जयंती दिनी स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.