HW News Marathi
देश / विदेश

शहीद नायर यांची हृदयस्पर्शी प्रेम कहाणी

पुणे | राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये शुक्रवारी (११ जानेवारी) सायंकाळी पेट्रोलिंग करत असलेल्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी इम्प्रोव्हाईज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईसच्या मदतीने स्फोट घडवून आणला. या हल्ल्यात महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर शशीधरन नायर यांना वीरमरण आले.

शशीधरन यांचे पार्थिव रविवारी (१३ जानेवारी) पुण्यातील दक्षिण मुख्यालयातील वॉर मेमोरियल येथे आणण्यात आले. सकाळी १० वाजता नवी पेठ येथील वैकुंठ स्मशान भूमीत लष्करी इतमामात शहीद मेजर शशीधरन यांना अखेरचा निरोप देण्यात आला

शशीधरन यांचा अल्प परिचय

मूळचे केरळचे असणाऱ्या मेजर शशीधरन यांचे कुटुंब सध्या खडकवासला परिसरात कृष्णा हाईट्स इमारतीत वास्तव्यास आहेत. शशीधरन यांनी केंद्रीय विद्यालयात शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात असताना त्यांनी एनसीसीमध्ये सहभाग घेऊन ‘उत्कृष्ट स्नातक’ किताब पटकावला होता. शशीधरन हे गोरखा राफलमध्ये कार्यरत होते. २००७ मध्ये डेहराडून येथील रक्षा अकादमीमधून प्रशिक्षण पूर्ण करून ते लष्करात दाखल झाले होते. त्यांच्या ११ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेत नेत्रदीपक कामगिरी केली.

शशीधरन नायर यांची प्रेम कथा

मेजर शशीधरन आणि तृप्ती पेंडा यांचा तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. तृप्ती या मूळ तेलुगू असून मेजर शशीधरन हे मल्याळी आहेत. तृप्ती यांनी संगणक अभियंत्याचे शिक्षण घेतले असून हे दोघेही पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर या दोघांच्या प्रेमाला कुटुंबियांनी परवानगी दिल्यानंतर यांचे लग्न ठरले. परंतु लग्न ठरल्यानंतर दोघेही भावी आयुष्याची स्वप्न रंगवत असतानाच त्यांना हादरवून टाकणारी घटना घडली. ती म्हणजे लग्नापूर्वी तृप्ती यांना मज्जारज्जूशी संबंधित आजार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांना आयुष्यभर व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागणार होता. यावेळी काही जणांनी शशीधरन यांना तृप्तीसोबत लग्न मोडण्याचा सल्ला दिला होता.

परंतु शहीद मेजर शशीधरन नायर यांनी ठरलेले लग्न न मोडता, तृप्तीशीच विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याशी सुखाचा संसार केला. शशीधरन सीमेवर तैनात असले तरी, तृप्ती यांच्यातील आत्मविश्‍वास जागविण्यासाठी ते नियमित विचारपूस करीत असत. त्यामुळे तृप्ती यांना मोठा मानसिक आधार मिळत होता. अशातच गेल्या ११ जानेवारी शशीधरन हे देशासाठी हुतात्मा झाल्याची बातमी आली आणि तृप्ती आणि शशीधनर यांचा संसाराचा डाव अर्धवटच राहिला. याचे दुःख त्यांच्या पत्नी आणि परिवारासाठी कायमच राहणार आहे. शशीधरन यांची ही कहाणी ऐकून आजही खऱ्या प्रेमला कुठल्याही धर्म, जात, रंग आणि रुप यांचे बंधन नसत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसला महाराष्ट्रात क्रमांक १ चा पक्ष बनवू | नाना पटोले

News Desk

अखेर हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी

Aprna

अखेर राहुल गांधींनी सांगितलं मोदींची गळाभेट घेण्याचं कारण

News Desk