लखनौ | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात शनिवारी (१२ जानेवारी) युतीची घोषणा केली. यानंतर अवघ्या २४ तासात रविवारी (१३ जानेवारी) काँग्रेसनेही उत्तर प्रदेशमध्ये स्वबळावर सर्व ८० जागा लढवणार असल्याची घोषणा काँग्रेसचे सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे.
GN Azad: We will fight on all 80 seats of Uttar Pradesh in upcoming Lok Sabha elections. We are fully prepared. And just like Congress emerged no. 1 party in Uttar Pradesh in 2009 Lok Sabha elections, we'll fight on our own & win twice those no. of seats in upcoming elections pic.twitter.com/v8MkY6EPMK
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 13, 2019
तसेच भाजप विरोधातील जर कोणताही धर्मनिरपेक्ष पक्षाने युतीसाठी हात पुढे केला तर, त्या पक्षासाठी काँग्रेसचा दरवाजा खुला आहेत, असे काँग्रेसचे सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात सपा, बसपा आणि काँग्रेस महाआघाडी करणार होते. परंतु, सपा- बसपाने आघाडी करत काँग्रेसला या दोघांनी बाजूला केले आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसने २००९ मधील लोकसभा निवडणुकीत २१ जागा जिंकल्या होत्या. आता आगामी निवडणुकीत या तुलेनत दुप्पटीने जागा जिंकू, अशी आशा देखील आझाद यांनी व्यक्त केली आहे.
GN Azad: We didn't break this alliance, public should know that. We had earlier also said that we're ready to walk with every party that wants to defeat BJP. But we can't force anyone. They've (SP-BSP) closed this chapter, so we'll continue this fight for defeating BJP on our own pic.twitter.com/8HcXZIMLr4
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 13, 2019
आम्हाला उत्तर प्रदेशात भाजप विरोधात महाआघाडी निर्माण करायीच होती. परंतु कोणाला ही महाआघाडी नको असेल, तर काही होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. सपा- बसपाच्या आघाडीवर बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर सर्व धर्मनिरपेक्ष पक्षाचे काँग्रेस स्वागत करत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.