नवी दिल्ली | राष्ट्रीय तपासल संस्थेने (एनआयए) बुधवारी (२७ डिसेंबर) उत्तरप्रदेश आणि दिल्लीत १७ ठिकाणी छापे टाकून दहशतवादी संघटना इसिसच्या १० संशयितांना अटक करण्यात आले आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात स्फोटके, शस्त्रास्त्रे, देशी बनावटीची रॉकेट लाँचर जप्त करण्यात आली आहेत. तसेच ७.५ लाख रोख रक्कम, सुमारे १०० मोबाईल्स, १३५ सीम कार्ड्स, लॅपटॉप्स आणि मेमरी कार्ड देखील हस्तगत केली आहेत.
An ISIS-inspired module, planning to carry out major terror attacks ahead of the Republic Day, was busted on Wednesday with the arrest of 10 terrorists by the National Investigation Agency in multi-city raids
Read @ANI Story | https://t.co/P67EpQ5J4a pic.twitter.com/KlE3zQiSmq
— ANI Digital (@ani_digital) December 26, 2018
एनआयएच्या कारवाईत इसिस या दहशतवादी संघटनाच्या नव्या मॉड्यूलचा खुलासा करण्यात आला आहे. सिसच्या या नव्या गटाचे नाव ‘हरकत उल हर्ब ए इस्लाम’ असे असल्याचे एनआयएच्या कारवाईत स्पष्ट झाले आहे. या नव्या मॉड्यूल देशातील मोठी राज्येतील गर्दीची ठिकाणे आणि राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याचा त्यांचा कट असल्याची माहिती मिळाली आहे.
IG NIA: Their targets were political persons and other important personalities and vital and security intallations. pic.twitter.com/xN7Wta9LQM
— ANI (@ANI) December 26, 2018
उत्तर प्रदेश आणि दिल्लीत एकूण १७ ठिकाणी छापे एनआयएने छापे टाकले. या कारवाईत १० संशयितांना अटक केली असून यातील ५ जणांना उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील अमरोहा भागातून अटक केली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या संशयितांवर उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथक आणि एटीएसने केली आहे. तर दिल्ली ५ संशयितांना अटक दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केले आहे.एनआयएने अटक करण्यात आलेले १० संशयित आरोपी हे २० ते ३० वयोगटातील असून मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.
#WATCH NIA conducts a raid in Delhi's Jafrabad area in connection with a new ISIS module styled as 'Harkat ul Harb e Islam' . pic.twitter.com/GL1GjOa1tq
— ANI (@ANI) December 26, 2018
इसिसच्या ‘हरकत उल हर्ब ए इस्लाम’ हा गट साखळी बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत होता, अशी माहिती एनआयएचे पोलिस महानिरीक्षक अलोक मित्तल यांनी दिली आहे. देशभरात धमाके करण्याच्या कटातील मुख्य आरोपी मुफ्ती सुहेल हा ‘हरकत उल हर्ब ए इस्लाम’ या नव्या मॉड्यूल यांच्यामार्फत हाताळले जाते. उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे राहणारा मुफ्ती सुहेल काही वर्षांपासून दिल्लीत होता. मशिदीत तो मुफ्ती आहे. त्याचे वडीलही मदरशात शिकवितात. हरकत-उल-हर्ब-ए-इस्लाम या ‘इसिस’च्या नवीन मॉडय़ुलचा सुहेल हा खतरनाक दहशतवादी असल्याची माहिती आहे. सुहेलची कसून चौकशी सुरू आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.