सुकमा | छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत आठ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे. या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. सुकमा जिल्ह्यातील किस्ताराम या जंगल परिसरात आज (२६ नोव्हेंबर) सकाळी सुरक्षा रक्षकांनी आठ दहशतवाद्यांना खात्मा करण्यात आला आहे.
2 District Reserve Guards (DRG) have died in action and 7-8 naxals have been neutralised in an encounter between troops of DRG & STF (Special Task Force) and naxals in Saklar village in Sukma district. Evacuation process is underway: Sukma SP Abhishek Meena #Chhattisgarh
— ANI (@ANI) November 26, 2018
सुकमा येथील पोलीस अधिकारी अभिषेक मीणा यांनी सांगितले की, आठ नक्षलवाद्यांचा ठार केले, परंतु यावेळी झालेल्या चकमकीत डीआरजीचे दोन जवान शहीद झाले आहेत. एसटीएफ आणि डीआरजी यांनी संयुक्तरित्या नक्षलवाद्यांविरोधात ही कारवाई केली. सुकमा जिल्ह्यातील सकलार गावात नक्षली लपून बसले होते. तसेच, त्याठिकाणी अद्यापही गोळीबार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
2 District Reserve Guards (DRG) have died in action and 7-8 naxals have been neutralised in an encounter between troops of DRG & STF (Special Task Force) and naxals in Saklar village in Sukma district. Evacuation process is underway: Sukma SP Abhishek Meena #Chhattisgarh
— ANI (@ANI) November 26, 2018
छत्तीसगड आणि तेलंगण सीमेवर नक्षलवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर एसटीएफ आणि डीआरजी यांनी संयुक्त पथक घटनास्थळी पोहचले. संयुक्त पथकाने या मोहिमेला ‘प्रहर चार’ असे नाव देण्यात आले होते. पोलिसांचे हे पथक किस्टाराम हद्दीत पोहचल्यानंतर नक्षलवाद्यांनी अंधाधुद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारीला चोख प्रत्युत्तर देत ८ नक्षलवादी मारले गेले, तर दोन जवान शहीत झाले, अशी माहिती नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.