HW News Marathi
देश / विदेश

सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील सुनावणी शुक्रवारी

नवी दिल्ली । सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील वादाबाबतची सुनावणी आज (१२ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात होणार होती. मात्र ही सुनावणी आता शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी केंद्रीय सतर्कता आयोगासमोर (सीव्हीसी) समोर हजेरी लावली आणि दोघांनीही आपली बाजू त्यामध्ये मांडली आहे.

सीव्हीसीचा अहवाल आज एका बंद लिफाफ्यातून सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. सीव्हीसीने आलोक वर्मा प्रकरणाचा तपास केला आहे. हा तपास सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए .के.पटनायक यांनी केला आहे. आज सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेतील खंडपीठासमोर याची सुनावणी घेण्यात येणार होती. मात्र आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्यप्रदेश विधानसभेचे कामकाज २६ मार्चपर्यंत तहकूब

News Desk

देशाची वाटचाल गुलामगिरीकडे- राहुल गांधी

News Desk

शबरीमाला मंदिराची अनेक वर्षे जुनी परंपरा संपविण्याचा प्रयत्न | शाह

News Desk