HW News Marathi
राजकारण

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला पर्यटकांची पसंती

सूरत | सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्ताने ऐक्याचे प्रतीक म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. हा पुतळा देशातील सर्वात उंच १८२ असून स्टॅच्यू ऑफ युनिटी हे नर्मदा नदीतील सरोवरामध्ये उभारण्यात आले आहे.

या पुतळ्यावरून देशातील राजकरणात अनेक चर्चा रंगल्या होत्या. परंतु अवघ्या काही दिवसात सर्वसामान्य पर्यटकांमध्ये मात्र स्टॅच्यू ऑफ युनिटी आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे. केवळ दिवाळीच्या सुट्टीमध्येच सुमारे ७५ हजार पर्यटकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली असून, केवळ येथील तिकीटविक्रीमधूनच सुमारे अडीच कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

मात्र या पुतळ्याची प्रवेश फी ही जगप्रसिद्ध ताहमहलच्या प्रवेश फीपेक्षा सातपट अधिक महाग असल्याने काही लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. तरीही येथे भेट देणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढत आहे. सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडचे मुख्य अभियंता पी.सी. व्यास यांनी सांगितले की, केवळ गुजरातच नाही तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामधूनही येथे पर्यटक येत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लोकशाही दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून कार्यक्रमाचे आयोजन

News Desk

महाराष्ट्राच्या सत्तांतरावर 21 ते 23 तारखेपर्यंत घटनापीठासमोर सुनावणीची शक्यता

Aprna

भाजपसाठी २०१९ मध्ये राम मंदिराचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा !

News Desk
राजकारण

चिमुकल्या विद्यार्थ्यांची सामाजिक दिवाळी

Gauri Tilekar

मुंबई | आपल्याकडे अनेक आदिवासी भागांत आजही दिवाळी साजरी होत नाही हे लक्षात घेऊन कल्याण येथील प्राथमिक विद्यामंदिर कर्णिक रोड शाळेतील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. या विद्यार्थ्यांनी विविध आकाराचे कंदील आणि आकर्षक पणत्या रंगविल्या आहेत. टिटवाळा येथील दहिवली या आदिवासी पाड्यावर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या सर्व साहित्याचे वाटप आले आहे. विशेष बाब म्हणजे या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपासून आपापल्यापरीने घरातून धान्य गोळा करून आणले होते. विद्यार्थ्यांनी गोळा केलेले तांदुळ, गहू, डाळ देखील त्यांनी या पाड्यावर वाटले.

“गेल्या चार वर्षांपासून आमची शाळा दिवाळीनिमित्त असा उपक्रम करत आहे. यापुढे देखील असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवण्याचा आमचा प्रयत्न राहील”, असे प्राथमिक विद्यामंदिर कर्णिक रोड शाळेच्या मुख्याध्यापिका भारती वेदपाठक यांनी सांगितले. या उपक्रमास शाळेतील अनेक माजी विद्यार्थी आणि पालकांनी देखील मोठी मदत केली. ‘टीम परिवर्तन’च्या मदतीने आदिवासी पाड्यावर गेल्या काही काळापासून सातत्याने विविध मोहीम राबविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Related posts

शरद पवार नक्षल्यांची भाषा का बोलत आहेत ?

News Desk

व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे अडचणीत आल्या किरण खेर आयोगाने पाठविले नोटीस

News Desk

स्वप्ने अशीच दाखवा जी पूर्ण करता येतील, गडकरींचा भाजपला घरचा आहेर

News Desk