HW News Marathi
राजकारण

अनिल अंबानी मोठ्या आर्थिक संकटात, दोन कंपन्यांच्या खात्यात १९ कोटी

मुंबई | उद्योगपती अनिल अंबानी राफेल डील घोट्यामुळे सध्या चर्चेत आहेत. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) व रिलायन्स टॉवर्स या दोन कंपन्यांच्या १४४ खात्यांत फक्त १९ कोटी ३४ लाख आहेत. अमेरिकन टॉवर्स कंपनीच्या (एटीएल) प्रकरणात रिलायन्सने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे.

बोस्टनच्या अमेरिकन टॉवर कॉर्पने अनिल अंबानी यांच्या आरकॉमवर २३० कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. त्यावरील याचिकेवर उत्तर देताना रिलायन्सने कोर्टात ही माहिती दिली आहे. त्या वेळी कंपनीच्या डोक्यावर ४६ हजार कोटींचे कर्ज आहे.रिलायन्स कम्युनिकेशन्स वायरलेस दूरसंचार क्षेत्रात कार्यरत होती. परंतु भरमसाठ तोट्यामुळे कंपनीने व्यवसाय बंद केला आहे. त्यासाठी हायकोर्टात दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान आरकॉमने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात कंपनीच्या खात्यात अत्यल्प पैसे असल्याचे उघड केले आहे.

आरकॉमच्या एकूण ११९ बँक खात्यांमध्ये १७ कोटी ८६ लाख रुपये आहेत. रिलायन्स टॉवर्स या उपकंपनीच्या २५ खात्यांत १ कोटी ४८ लाख आहेत. दोन्ही मिळून कंपनीच्या खात्यात फक्त १९ कोटी ३४ लाख आहेत. त्यामुळेच एटीएलच्या २३० कोटींची थकबाकी देणे शक्य नाही, असे कंपनीने म्हटले आहे. कर्जपरतफेडीसाठी आरकॉमने त्यांच्या मालमत्तेची रिलायन्स जिओला १८ हजार कोटींना विकण्याचा निर्णय घेतला होता. रिलायन्स जिओची तयारीही अंतिम टप्प्यात होती, पण त्याच वेळी एरिक्सन कंपनीने ५५० कोटींच्या वसुलीसाठी या व्यवहाराविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आम्ही जसे ब्रिटिशांविरुद्ध लढलो, जिंकलो त्याचीच पुनरावृत्ती आताही करू !

News Desk

नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ED च्या ताब्यात

Aprna

“अजूनही वेळ गेलेली नाही, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू,” उद्धव ठाकरेंचे बंडखोरांना भावनिक आवाहन

Aprna
राजकारण

२०१९च्या निवडणुकीत ‘कर्नाटकी कशिद्या’ची छाप दिसेल काय?

News Desk

मुंबई | पोटनिवडणुकांच्या निकालांतील भाजपच्या पराभवाची मालिका मागच्या पानावरून पुढच्या पानावर सुरूच आहे. मागे उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांच्या पोटनिवडणुकांत जे घडले, तेच आता कर्नाटकातही घडले आहे. कर्नाटकातील लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 2 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या 5 जागांपैकी केवळ एकच जागा भाजपने कशीबशी जिंकली. 2019 च्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना कर्नाटकात जो सपाटून मार खावा लागला, तो भाजपसाठी तर धक्कादायक आहेच, पण त्याहीपेक्षा काँग्रेसच्या निप्राण देहात प्राण फुंकणारा हा निकाल आहे. कर्नाटकातील सुबक कशिदाकारीची कला जगप्रसिद्ध आहे. साडय़ांसह विविध वस्त्रांवर होणाऱ्या कशिद्याच्या कामाने लावणीसारख्या लोककलेलाही वेड लावले. तोच कर्नाटकी कशिदा आता राजकीय पटलावरही अवतरला आहे. २०१९ च्या निकालांवर पोटनिवडणुकांतील याच ‘कर्नाटकी कशिद्या’ची छाप दिसेल काय?, असा सवाल शिवसेनेच्या सामना या मुखमपत्रातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकातील जनतेला केला आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

2014 च्या निवडणुकीत 282 जागा जिंकून भाजपने सर्वांनाच चकित केले होते. मात्र, पोटनिवडणुकांतील सततच्या अपयशामुळे भाजपचे लोकसभेतील संख्याबळ आता 10 जागांनी घटून 272 वर येऊन पोहोचले आहे. कर्नाटकातील पोटनिवडणुकांचे निकाल ही तर भाजपसाठी धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. कर्नाटकातील सुबक कशिदाकारीची कला जगप्रसिद्ध आहे. साड्यांसह विविध वस्त्रांवर होणाऱ्या कशिद्याच्या कामाने लावणीसारख्या लोककलेलाही वेड लावले. तोच कर्नाटकी कशिदा आता राजकीय पटलावरही अवतरला आहे. 2019 च्या निकालांवर पोटनिवडणुकांतील याच ‘कर्नाटकी कशिद्या’ची छाप दिसेल काय?

पोटनिवडणुकांच्या निकालांतील भाजपच्या पराभवाची मालिका मागच्या पानावरून पुढच्या पानावर सुरूच आहे. मागे उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांच्या पोटनिवडणुकांत जे घडले, तेच आता कर्नाटकातही घडले आहे. कर्नाटकातील लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 2 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या 5 जागांपैकी केवळ एकच जागा भाजपने कशीबशी जिंकली. अन्य चारही जागांवर काँग्रेस व जेडीएसचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. मतविभाजन हाच भाजपच्या विजयाचा मूळ आधार आहे आणि तेच होऊ द्यायचे नाही, याची पक्की खूणगाठ आता भाजपविरोधी पक्षांनी बांधलेली दिसते. त्यामुळेच उत्तर प्रदेशात जसे सपा आणि बसपाने एकत्र येऊन पोटनिवडणुकांत भाजपला अस्मान दाखवले, तोच प्रयोग आता कर्नाटकातही काँग्रेस आणि जेडीएसने यशस्वी करून दाखवला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना कर्नाटकात जो सपाटून मार खावा लागला, तो भाजपसाठी तर धक्कादायक आहेच, पण त्याहीपेक्षा काँग्रेसच्या निप्राण देहात प्राण फुंकणारा हा निकाल आहे. भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या बेल्लारी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार व्ही.एस. उगरप्पा 2 लाख 43 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. भाजपचे मातब्बर नेते श्रीरामुलू यांची बहीण जे. शांता यांचा येथे मानहानीकारक पराभव झाला. बेल्लारी म्हणजे

कर्नाटक भाजपचे नाक

मानले जाते. गेली 14 वर्षे ही जागा भाजपच्या ताब्यात होती. मात्र, हे नाकच आज भाजपकडे राहिले नाही. मंड्या लोकसभा मतदारसंघात तर भाजपची बेल्लारीपेक्षाही अधिक वाताहत झाली. येथून भाजपने निवृत्त सनदी अधिकारी सिद्धरामय्या यांना उमेदवारी दिली होती. मात्र, जनता दलचे (सेक्युलर) उमेदवार एल.आर. शिवरामी गौडा यांनी तब्बल सवातीन लाखांच्या आसपास मताधिक्य घेऊन भाजपचा येथे मोठा पराभव केला. कर्नाटक विधानसभेच्या 2 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकाही काँग्रेस-जेडीएस युतीने जिंकल्या. भाजपने एकमात्र जागा जिंकली, ती शिमोगा लोकसभा मतदारसंघाची. येथून माजी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांचे चिरंजीव बी.वाय. राघवेंद्र विजयी झाले. मात्र, काँग्रेस-जेडीएसचे उमेदवार दोन-तीन लाखांहून अधिक मतांनी निवडून आले असताना भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव केवळ 52 हजार मतांनी निवडून येतात, हा फरकही नक्कीच लक्षात घेण्यासारखा आहे. सातत्याने होणाऱ्या पोटनिवडणुकांतील दारुण पराभवाचे विश्लेषण, मंथन आणि चिंतन पराभूत पक्ष त्यांच्या परीने करीलच; मात्र देशात इतक्या सगळय़ा चांगल्या गोष्टी होत असण्याचा आणि क्रांतिकारक वगैरे बदल घडत असल्याचा सत्तारूढ पक्षाचा दावा असताना त्यांचा असा पराभव का व्हावा, हे कोडे नाही म्हटले तरी जनतेला पडले आहे. चार वर्षांपूर्वी उसळलेल्या लाटेचे अचानक हे काय झाले? तोडफोड आणि

जोड-तोड पितळ

यात विशेष प्रावीण्य असणारे पांडित्य आता काम का करत नाही, असे प्रश्न सरकार पक्षाच्या समर्थकांनाही पडले असणारच. 2014 साली मिळालेला जनाधार आता किमान 50 वर्षे तरी सरकणार नाही, अशी छातीठोक खात्री देणाऱ्यांनाही चार वर्षांतच घसरणीला लागलेल्या जनाधाराने चिंतेत टाकले आहे. 2014 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने देश काँग्रेसमुक्त करण्याचा नारा दिला होता आणि देशवासीयांना ‘अच्छे दिन’ येतील, अशी ग्वाही दिली होती. मात्र, काँग्रेसमुक्त हिंदुस्थानच्या घोषणेला चार वर्षांतच घरघर लागली. देशातील सर्वसामान्य जनता ‘अच्छे दिन’च्या शोधात असली, तरी पोटनिवडणुकांच्या निकालांतून मात्र काँग्रेसचेच ‘अच्छे दिन’ परतून येत असल्याचे सूचक चिन्ह डोकावताना दिसते आहे. 2014 च्या निवडणुकीत 282 जागा जिंकून भाजपने सर्वांनाच चकित केले होते. मात्र, पोटनिवडणुकांतील सततच्या अपयशामुळे भाजपचे लोकसभेतील संख्याबळ आता 10 जागांनी घटून 272 वर येऊन पोहोचले आहे. कर्नाटकातील पोटनिवडणुकांचे निकाल ही तर भाजपसाठी धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. राममंदिर, जम्मू-कश्मिरातील 370 कलम रद्द करणे आणि समान नागरी कायदा या मूळ विषयांना बगल देऊन भलताच अजेंडा राबविल्याचा देखील हा परिणाम असू शकतो. कर्नाटकातील सुबक कशिदाकारीची कला जगप्रसिद्ध आहे. साडय़ांसह विविध वस्त्रांवर होणाऱ्या कशिद्याच्या कामाने लावणीसारख्या लोककलेलाही वेड लावले. तोच कर्नाटकी कशिदा आता राजकीय पटलावरही अवतरला आहे.

2019 च्या निकालांवर पोटनिवडणुकांतील याच ‘कर्नाटकी कशिद्या’ची छाप दिसेल काय?

Related posts

निवडणूक आयोग हे पंतप्रधान मोदींच्या दावणीला बांधलेले आहे !

News Desk

रायगड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवीशेठ पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk

#ElectionsResultsWithHW : देशातील प्रतिष्ठेच्या लढती

News Desk