HW News Marathi
मुंबई

धारावीच्या पुनर्विकासावरुन बीएमसी-राज्य सरकारमध्ये वाद

मुंबई । आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीचा लवकरच पुनर्विकास होणार आहे. या प्रकल्पाला राज्य सरकारने ‘विशेष प्रकल्प दर्जा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. धारावीच्या पुनर्विकासावरुन मुंबई महापालिका आणि राज्य सरकार यांच्यात वाद चांगलाच रंगला आहे. धारावीच्या पूनर्विकास प्रकल्पात महापालिकेचे अधिकार आणि स्थान डावलले जात आहे.असा आरोप शिवसेनेने राज्य सरकारवर केला आहे.

या प्रकल्पातील ७० टक्के जागा ही मुंबई महापालिकेच्या मालकीची आहे. महापालिकेच्या जमिनीवर प्रकल्प राबवताना पालिकेला त्याचा काही मोबदला मिळणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. धारावीमधील २०० एकरहून अधिक जागेतील भूखंडांचे आरक्षण बदलण्याचे निर्णय सीईओनी घेतला आहे. “हा निर्णय मुंबई महापालिकेच्या अधिकारावर गदा आणणारा आहे. तसेच पालिकेला दुबळे करण्याचाच हा प्रयत्न आहे”,असे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईत तीनशे किलो टोमॅटोवर दरोडा!

News Desk

गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची स्वच्छता

Manasi Devkar

महाराष्ट्राचे ‘उंदरालय’ सामनातून सरकारवर टीका

News Desk
राजकारण

रामाची भव्य मूर्ती उभारणार, योगी आदित्यनाथ यांची घोषणा

Gauri Tilekar

अयोध्या | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता रामाची भव्य मूर्ती उभारणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच राम मंदिराच्या जागेवर मंदिरच बांधणार आणि रामाच्या मूर्तीसाठी जागेची पाहणी करण्यात येणार असल्याचेही योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी शरयू नदीच्या काठावर जागा पाहिल्याचेही सांगितले आहे.

अयोध्येमध्ये रामाचा १५१ मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. यावर योगी आदित्यनाथ यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. रामाची मूर्ती सर्व नियम पाळूनच उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासाठी सर्व संत आपल्यासोबत असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. कालच योगी आदित्यनाथ यांनी फैजाबादचे नाव बदलून अयोध्या असे केले आहे.

Related posts

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू; ‘या’ मुद्द्यांवर अधिवेशन जागण्याची शक्यता

Aprna

#LokSabhaElections2019 : प्रकाश आंबेडकरांच्या जातीवादाविरुद्धच्या संघर्षाला काय अर्थ उरतो ?

News Desk

मध्य प्रदेशसह राजस्थानच्या शपथविधी सोहळ्यात भाजप नेत्यांची हजेरी

News Desk