भोपाळ | मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सर्वत्र जोरदार प्रसार सुरु आहे. त्यामुळे सर्वच पक्षच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप करीत आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीनी ही आक्रमकपणे प्रचार कार्याला सुरुवात केली आहे. प्रचारा दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर टीका करण्याच्या नादात शिवराज सिंह चौहान यांच्या मुलावर राहुल गांधीनी पनामा पेपर्स प्रकरणी आरोप लावला आहे. राहुल गांधींच्या या टीकेमुळे शिवराज सिंह यांचे पुत्र कार्तिकेय याने राहुल गांधी विरोधात मानहानीचा दावा केला आहे.
कार्तिकेयचे नाव पनामा पेपर्सप्रकरणी जोडल्याने राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधींना आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी आपण कन्फ्युज झालो होतो त्यामुळे मी शिवराज सिंह यांच्या मुलाचे नाव घेतले, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. “मध्य प्रदेश आणि भाजपा शासित राज्यांत मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याने मी संभ्रमात असल्याने पनामा पेपर्स घोटाळ्यात शिवराज सिंह यांच्या मुलाचे नाव घायचे नव्हते, तर छत्तीसगडह्या मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या मुलाचे नाव घायचे होते. शिवराज सिंह यांचे नाव तर व्यापमं घोटाळ्यात होते, अशी सारवासारव राहुल गांधींनी केली आहे.
Kartikey Chouhan has filed a defamation case against Rahul Gandhi over his statement 'MP CM's son's name was mentioned in Panama Papers leaks,'during a political rally y'day. This is a objectionable statement given with a criminal intention:S Srivastava,lawyer of Kartikey Chouhan pic.twitter.com/2Z0T283ghM
— ANI (@ANI) October 30, 2018
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचं घोटाळ्यात नाव होते तेव्हा पाकिस्तानसारख्या देशाने त्यांना तुरुंगात डांबले परंतु इथल्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्स घोटाळ्यात येऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप राहुल गांधींनी केला होता. असे राहुल गांधी यांनी सोमवारी एका सभेत सांगितले. “जर कुणी कनिष्ठ नेत्याने असा आरोप केला असता तर गोष्ट वेगळी होती. पण खुद्द काँग्रेस अध्यक्षानीच अशाप्रकारचे आरोप लावणे दुर्भाग्य आहे असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.