HW News Marathi
राजकारण

नरेंद्र मोदींचे पंतप्रधान पद जाणार !

मुंबई | आगामी निवडणुकांनंतर राज्यात आणि केंद्रात सत्ता परिवर्तन होईल आणि आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते सत्तेत राहणार नाहीत. देशात सत्तांतर होऊन नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागेल, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वर्तविले आहे. एका वाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी हे भाकीत केले आहे.

शरद पवार म्हणाले की, २००४ मध्ये ज्या प्रकारे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं, तीच परिस्थिती २०१९ मध्ये असणार आहे. निवडणुकीनंतर सर्व पक्ष मनमोहन सिंग यांच्या समर्थनार्थ एकवटले होते आणि ते पंतप्रधान झाले. २००४ मध्ये जशी परिस्थिती होती, तशीच परिस्थिती २०१९ मध्ये कायम राहणार आहे. २०१९ मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याने त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येईल आणि पुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांच्या अपात्रेवर सुनावणी सुरू

Aprna

जयाप्रदा रामपूरमधून आझम खानविरोधात निवडणूक लढणार

News Desk

२०१९ च्या लोकसभा निवणुकांमध्ये ‘हा’ असेल भाजपचा नवा नारा

News Desk
देश / विदेश

कोजागिरी पौर्णिमेला दुधाचे सेवन का केले जाते?

Gauri Tilekar

दसऱ्यापासून शरद म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चंद्राचे चांदणे हे गुणकारी आणि औषधी असते, असे मानले जाते. अशी मान्यता आहे की, ‘लंकाधिपती रावण हा शरद पौर्णिमेच्या रात्री आरश्याच्या माध्यमातून चंद्राचे चांदणे नाभीमध्ये ग्रहण करायचा, असे केल्यानेच रावणाला शक्ती प्राप्त होत होती. ‘शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा आश्विन पौर्णिमासुद्धा म्हटले जाते.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री खीर किंवा मसाला दूध बनले जाते. खुल्या निरभ्र आकाशखाली ते ठेवले जाते. यामागे अशी दंतकथा आहे की चंद्राच्या चांदण्यातून अमृत त्या खिरीत किंवा मसाला दुधामध्ये येते. परंतु या मागे एक वैज्ञानिक कारण आहे, ते म्हणजे दुधामध्ये लैक्टिक ऍसिड आणि अमृत घटक आहे. हा घटक चंद्राच्या किरणांना मोठ्या प्रमाणात शोषून घेतो. त्याच कारणामुळे ऋषीमुनींनी खीर रात्री मोकळ्या आकाशाच्या खाली ठेवण्यास सुरुवात केली. ही परंपरा विज्ञानावर आधारित आहे.

शरद पौर्णिमेचे अनेक फायदे आहेत. शरद पौर्णिमेच्या रात्री प्रत्येकाने ३० मिनिटे तरी चंद्राच्या चांदण्यात उभे राहावे, असे म्हटले जाते. शरद पौर्णिमेची रात्र ही दम्याचा आजार असलेल्या लोकांसाठी अत्यंत उपयोगी असते, असे म्हटले जाते. ज्यांची दृष्टी कमी असेल तर त्यांनी दसऱ्यापासून शरद पौर्णिमेपर्यंत रात्री १० ते १५ मिनिटे चंद्राकडे पाहावे, असा सल्लाही देण्यात येतो.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, याकडे जय, पराजयच्या दृष्टीने बघू नये !

News Desk

‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ पुस्तकाचे भाजपकडून प्रकाशन..

Arati More

भारतरत्न जाहीर झाल्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी केले ‘हे’ विधान

News Desk