रायपूर । छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याविरोधात काँग्रेसने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भाची करुणा शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. रमण सिंह हे राजनांदगांव मतदारसंघातून निवडणूक लढवतात. यंदा त्यांच्यासमोर करुणा शुक्ला यांचे आव्हान असेल.
Atal Bihari Vajpayee & Lal Krishna Advani had established the BJP, the party has lost its ideologies & culture. Keeping these things in mind I left BJP after being associated with the party for 32 years: Karuna Shukla, niece of Atal Bihari Vajpayee pic.twitter.com/LzzYcrEC9W
— ANI (@ANI) October 23, 2018
करुणा शुक्ला १९९३ मध्ये पहिल्यांदा भाजप पक्षातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनतर त्यांनी संसदेत जांजगीर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. गेल्या ४-५ वर्षांपासून छत्तीसगडच्या भाजपच्या नेतृत्त्व आणि रमण सिंह सातत्याने यांच्यावर टीका होत आहे. २०१४ मध्ये करुणा शुक्ला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने करुणा यांना बिलासपूरमधून उमेदवारी दिली होती. मात्र त्या अपयशी ठरल्या होत्या.
काँग्रेसने पहिल्या टप्प्यातील १८ जागांपैकी १२ जागांवरील उमेदवार जाहीर केले होते. यानंतर ६ उमेदवारांची जाहीर काँग्रेसकडून काळ (२२ ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली. छत्तीसगडमध्ये १२ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातलं मतदान होईल. ११ डिसेंबरला निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.