HW News Marathi
देश / विदेश

‘उत्तर प्रदेशात शीर कापून आणणाऱ्याला १ कोटींचे बक्षीस’

बहराईच | काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर यांनी गुजरातमधील उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या लोकांना मारहाण करुन तेथून त्यांना हुसकावून लावले होते. त्यामुळे उत्तर प्रदेशात पोस्टर्स लावून अल्पेश ठाकोर यांचे शीर कापून आणणाऱ्याला १ कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ‘महाराणी पद्मावती युथ ब्रिगेड’ नावाच्या एका संघटनेने असे पोस्टर्स लावले असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ अशा स्वरुपाचे पोस्टर हटवत समाजातील शांतता भंग करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

गरीब कामगारांना मारहाण करणारे अल्पेश ठाकोर आणि त्यांचे कार्यकर्ते हे राक्षसी प्रवृत्तीचे आहे. त्यांच्याविरोधात सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे ‘महाराणी पद्मावती युथ ब्रिगेड’चे राष्ट्रीय अध्यक्ष भवानी ठाकूर यांनी म्हटले आहे. जर अल्पेश ठाकोर गुजरात सोडून गेले नाहीत तर आम्ही गुजरातमध्ये घुसून त्यांचा शिरच्छेद करू, अशी धमकीदेखील भवानी ठाकूर यांनी दिली आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक अजय प्रताप सिंह यांनी सांगितले की, उपद्रवी लोकांनी समाजात अशाप्रकारे असंतोष आणि अशांतता पसरवू नये यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. आमदार अल्पेश ठाकोर यांच्याबाबत करण्यात आलेल्या या वक्तव्याचे समर्थन केले जाऊच शकत नाही. त्यामुळे आम्ही सर्व पोलीस ठाण्यांना पोस्टर्स हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा ‘चक्काजाम’ झालाय ?”, शेलारांचा बोचरा सवाल

News Desk

आम्हाला कोणीही तोडू शकत नाही, आम्ही मजबूत आहोत, आम्ही युक्रेनियन आहोत! – व्होदिमर झेलेन्स्की

Aprna

विरोधी पक्षाच्या मागणीमुळे ईव्हीएममध्ये मोठा बदल

News Desk