लखनऊ | ‘उत्तर प्रदेशातील न्याय व्यवस्था उद्ध्वस्त झाली असून येथे ब्राम्हणांचे शोषण होत आहे. हे वातावरण प्रदेशासाठी धोकादायक असल्याचे बहुजन समाज पार्टी अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांनी म्हटले आहे.’ प्रदेशाच्या राजधानी लखनऊ येथे अॅपलच्या एरिया मॅनेजरला पोलिसांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. या घटनेवरून उत्तर प्रदेशात राजकारण पेटलेले दिसून येत आहे.
#WATCH BSP Chief Mayawati says, "Aisa lag raha hai ki Uttar Pradesh mein kanoon vyavastha poori tarah dhawast ho chuki hai.", on #VivekTiwari death case pic.twitter.com/NQOgOMttZF
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 1, 2018
विवेक तिवारी यांच्या हत्येवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कोंडी करण्याचा प्रयत्न मायावती यांनी केला आहे. तसेच मायावती यांनी या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. तिवारी यांच्या परिवाला न्याय मिळवून देऊ असा दावा देखील मायावती यांनी प्रसार माध्यामांशी संवाद साधताना केला आहे.
If I were the Chief Minister, I would have first taken action against the involved cops, and only then met the victim family. Not the other way round like the CM did: BSP Chief Mayawati on Vivek Tiwari case pic.twitter.com/hRNKdkhZ76
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 1, 2018
नेमके काय आहे प्रकरण
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ मधधी गोमती नगर या उच्चभ्रू परिसरात पोलीस कॉन्स्टेबलने अॅपलच्या मॅनेजरची गोळ्या घालून हत्या केली होती. रात्री उशिरा विवेक स्वतःच्या सहका-याला बरोबर घेऊन कामावरून घरी परतत होता. त्याच दरम्यान गोमतीनगर परिसरात दोन पोलिसांनी त्याला गाडी थांबवण्याचा इशारा केला. परंतु विवेकने गाडी न थांबविता निघून गेल्याने पोलिसांनी त्याच्या गाडीवर गोळीबार केला. त्या गोळीबारात एक गोळी विवेकच्या डोक्याला लागली आणि विवेकचा मृत्यू झाला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.