HW News Marathi
राजकारण

आठवलेंची आबा बागुल यांना ऑफर

पुणे | “काँग्रेसकडून तिकीट मिळत नसेल तर आमच्या पक्षात या“, असं निमंत्रण केंद्रीय सामाजिकी न्यायमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते आबा बागुल यांना केले आहे. “मी काही काळ काँग्रेस पक्षासोबत होतो, मला आबा बागुल चांगले माहित आहेत. ते पाच वेळा नगरसेवकही होते.” तरीही जर त्यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळत नसेल, तर त्यांनी आमच्या पक्षात यावे. पर्वती विधानसभा मतदार संघातून आबा बागुल उमेदवारीसाठी इच्छुक आहे.

याआधी आठवले यांनी उदयनराजे भोसले यांना सुद्धा आरपीआय पक्षात येण्यासाठी निमंत्रण दिले होते. केंद्रीय मंत्री व भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी असे म्हंटले की ‘उदयनराजे यांनी आमच्या पक्षात यावे. यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघात निडणूक आमच्या पक्षातून(रिपाई) लढावी’ अशी ऑफर केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेने ईडीला उद्देशून केलेले ट्वीट ‘डिलीट’

News Desk

हिंदू मतांच्या गणितासाठी भाजपच्या संकल्पपत्रात पुन्हा ‘राम मंदिरा’चा उल्लेख

News Desk