HW News Marathi
देश / विदेश

भ्रष्ट दाभोलकरांच्या नावे शास्त्रज्ञाला पुरस्कार, विचित्र विरोधाभास | हिंदू जनजागृती समिती

महाराष्ट्र| सातारा महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना जाहीर झाला आहे.परंतु देशभक्त शास्त्रज्ञाला समाजाची दिशाभूल करणारे आणि भ्रष्ट डॉ. दाभोलकरांच्या नावे पुरस्कार मिळणे हा विचित्र विरोधाभासच आहे, असे हिंदू जनजागृती समिती शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारास विरोध दर्शवला. डॉ. काकोडकर यांचे कार्य आणि देशाप्रतीचे योगदान नक्कीच मोठे आहे. पण त्यांना भ्रष्ट डॉ. दाभोलकरांच्या नावे पुरस्कार मिळणे हा विरोधाभास आहे. डॉ. दाभोलकरांनी कधीच सामाजिक कार्य केले नाही. असे शुक्रवारी पुण्यातझालेल्या पत्रकार परिषदात हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक पराग गोखले यांनी म्हटले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोकरांनी नेहमीच स्वत:च्या कुटुंबाची तुंबडी भरण्याचे काम केले आहे, असे आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना जाहीर झाला असतानाच हिंदू जनजागृती समितीने काकोडकर यांनी समाजाची दिशाभूल करणाऱ्या डॉ. दाभोलकरांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार नाकारावा, अशी मागणी केली आहे.

दाभोलकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार न स्वीकारुन डॉ. काकोडकर यांची प्रसिद्धी, देशाविषयी योगदान यात तसूभरही फरक पडणार नाही. याऊलट हा पुरस्कार स्वीकारल्यास एक शास्त्रज्ञ दाभोलकरांच्या गैरकारभाराचे आणि खोट्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचे समर्थन करत आहे, असा संदेश समाजात जाईल, असे गोखले यांनी सांगितले आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींचे आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेचे निमंत्रण

News Desk

बी. एस. येडियुरप्पा फक्त अडीच दिवसांचे मुख्यमंत्री

News Desk

एअर इंडियाच्या विमानची मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

swarit