HW News Marathi
मुंबई

परप्रांतीयांनी काम न केल्याने मुंबई बंद पडणार नाही | आठवले

मुंबई । मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलेल्या वक्तव्यावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मनसेने “निरुपम म्हणजे भटका कुत्रा”असा मजकूर लिहून सोशल मीडियावर पोस्टर्स व्हायरल करून संजय निरुपम यांच्यावर टीका केली आहे. “उत्तर भारतीयांनी मुंबईत काम केले नाही तर मुंबई बंद पडणार हे मान्य नाही,” असे भारतीय रिपब्लिकन पक्ष या पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटले आहे. “निरुपम यांनी मराठी भाषिक आणि उत्तर भारतीयांमध्ये वाद निर्माण करून देऊ नये. असा वाद निर्माण केल्यास काँग्रेसला काही फायदा होणार नाही. त्या उलट मराठी भाषिक त्यांचा विरोधच करतील,” असेही रामदास आठवले म्हणाले आहेत. “उत्तर भारतीयांचे मुंबईला मोठे योगदान आहे, यात दुमत नाही. परंतु त्यांनी काम न केल्याने मुंबई बंद पडणार हे मला मान्य नाही,” असे रामदास आठवले म्हणाले आहेत.

काय होते संजय निरुपम यांचे वादग्रस्त वक्तव्य

“उत्तर भारतीय कोणत्याच कामात मागे नाहीत. सगळ्या क्षेत्रात ते सक्रिय आहेत. उत्तर भारतीय लोक टॅक्सी-रिक्षा चालवण्यापासून दूध विकण्यापर्यंतची सगळी काम ते करतात. फळ, भाजी, वर्तमानपत्र विकणे अशी सर्वच कामे उत्तर भारतीयच समाज करतो. मुंबईकरांचा भार उत्तर भारतीय त्यांच्या खांद्यावर घेऊन चालत असतो. बांधकाम क्षेत्रातसुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीयच असतात. जर कधी उत्तर भारतीयांनी ठरवले की काम करायचे नाही. तर मुंबई आणि महाराष्ट्र ठप्प पडेल. मुंबईकरांना जेवायला सुद्धा मिळणार नाही”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई महापालिकेतील मनसेचे नगरसेवक फुटणार ? 

News Desk

पुण्यात मुख्यमंत्र्यांची पारदर्शी सभा – सोशल मिडीयावर सभेबाबत उलटसुलट चर्चा

News Desk

सीएसटी जीआरपी पोलिसांकडून चालत्या रेल्वेत पर्स ओढणाऱ्या आरोपीला अटक

swarit
मुंबई

कल्याणमध्ये विहिरीत पडून पाच जणांचा मृत्यू

Gauri Tilekar

कल्याण | कल्याणमधील नेतीवली लोकग्राम येथील रसायनमिश्रित विहिरीत सफाईसाठी एक सफाई कामगार उतरला होता. त्यानंतर तो बराच वेळ विहिरी बाहेरतून बाहेर न आल्याने २ स्थानिक नागरिक सफाई कामगाराला वाचविण्यासाठी विहिरीत उतरले. परंतु तिघेही विहिरीतून बाहेर आले. यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले होते.

अग्निशमन दलाचे प्रमोद वाकचोरे आणि अनंत शेलार हे दोन जवान विहिरीत उतरले. मात्र ते देखील बाहेर आले नाही. त्यानंतर पाचजणही बुडाल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी गर्दी जमा झाली. ही घटना आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दलाचे पथक शोधमोहीम राबवत असताना पाचही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

घटनास्थळी मदतीसाठी एनडीआरएफ, टीडीआरएफ आणि ठाणे महानगरपालिका अग्निशमन दलाची मदत पाठविण्यात आली आहे. पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अग्निशमन दलाचे जवान अनंत शेलार, प्रमोद वाकचोरे, राहुल गोस्वामी (मुलगा) आणि गुणाभाई गोस्वामी (वडील) यांचे मृतदेह सापडले असून अन्य एका मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

Related posts

लोकलमध्ये मंगळसूत्र चोरून ट्रॅकवर उडी मारणारी महिला पोलिसांच्या ताब्यात

News Desk

 जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या पार्श्वभूमीचं विश्लेषण

News Desk

लागला एकदाचा टीवाय बीकॉमचा ‘निक्काल’!

News Desk