HW News Marathi
मुंबई

लोकलमध्ये मंगळसूत्र चोरून ट्रॅकवर उडी मारणारी महिला पोलिसांच्या ताब्यात

मुंबई | मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला डब्यातील महिलेचे मंगळसूत्र चोरून रेल्वे ट्रॅकवर उडी मारल्याची घटना घडली विक्रोळी रेल्वे स्टेशनवर घडली आहे. या चोरट्या महिलेला जेल बंद करण्यात कुर्ला पोलिसांना यश आले आहे. या चोर महिलेचे नाव सीता सोनावनी (वय २५) असून तिल चाळीत दिव्यामध्ये राहते.

ही महिला सीएसएमटी–कल्याण लोकलमध्ये प्रवास करत होती. लोकल विक्रोळी स्थानकात पोहोचताच तिने एका महिलेचे मंगळसूत्र ओढले आणि पळ काढताना तिने ट्रॅकवर उडी मारली. हे मंगळसूत्र मालतीदेवी सिंग (वय ३०) या महिलेचे होते. मालतीदेवी सिंग हिने मंगळसूत्र चोरीची तक्रार केली. यानंतर रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटजे पाहिल्यानंतर या महिलेला पकडण्यात आले. या मंगळसूत्राची किंमत १८ हजार रुपये अशी आहे.

महिला चोर सीताने रेल्वे ट्रॅकवर उडी मारली. तेव्हा सुदैवाने विरुद्ध दिशेने कोणतीही लोकल जात नव्हती. अन्यथा महिला थेट रेल्वेखाली आली असती. सीसीटीव्हीत दिसत असल्याप्रमाणे महिलेने उडी मारल्यानंतर समोरील प्लॅटफॉर्मवरून पळ काढला. कुर्ला पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत महिलेला अटक केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात मुलाच्या तुलनेत मुलीचा जन्मदर कमी

News Desk

संविधान सन्मान लाॅग मार्च

News Desk

फेरीवाल्यांविरुद्ध लढण्यापेक्षा सीमेवर जाऊन लढा. –रामदास आठवले

News Desk