HW News Marathi
मुंबई

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला मनसे कार्यकत्यांकडून चोप

ठाणे । ठाण्यात एका अल्पवयीन मुलीबरोबर अश्लील चाळे करणाऱ्या परप्रांतीय नराधमाला मनसेच्या कार्यर्त्यांनी भर पत्रकार परिषदेत चोप दिला आहे. हा नराधम उत्तर भारतीय आहे. एका व्हिडिओच्या आधारे मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या नराधमाला शोधून काढले आणि सोमवारी ताब्यात घेतले. पत्रकार परिषद झाल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

“गुजरातसारखी पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको. जर त्यांनी वाईट वागणूक सोडली नाही तर आम्ही सगळ्या उत्तर भारतीयांना मारून मारून हाकलवून लावू, असा इशारा मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. बिहार, उत्तरप्रदेश, झारखंडमधून घाण महाराष्ट्र्र येते,” अशा प्रकारची टोकाची टीका मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांवर केली आहे.

बलात्कारसारख्या गंभीर घटनांना उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा रंग देण्याचा प्रयत्न करत आहात का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले कि, “आमचे उद्दिष्ट्य अशा लोकांना चोप देणे हे आहे. आम्ही बलात्काराच्या घटनांना जातीय रंग देत नाही. ठाण्यात जेवढ्या मोठ्या घटना घडल्या त्यात उत्तर भारतीयच आहेत ही वस्तूस्थिती आहे.”

ठाणे, नवी मुंबई, मुंबई अशा तिन्ही शहरातल्या मुलींसोबत त्याने अश्लील चाळे केल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हा नराधम झारखंडमध्ये राहणार आहे. तो ठाण्यातल्या वागळे इस्टेटमधल्या मुलीसोबत अश्लील चाळे करताना दिसताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला अत्यंत आक्रमक पद्धतीने धडा शिकवला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पहिल्याच पावसात रेल्वेचा बोजवारा

News Desk

मनसे विभागप्रमुखावर हल्ला करणा-यांना अटक

News Desk

कौशल्य प्रशिक्षण संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी दर २ महिन्यांनी संस्थांचा जनता दरबार! – मंगलप्रभात लोढा

Aprna
देश / विदेश

काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये दिवसेंदिवस दहशतवादी कारवाया वाढत आहेत. काश्मीरमधील कुलगाम येथे रविवारी पहाटेच्या सुमारास सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या परिसरात अजून काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सुरक्षा दलाने या परिसरातील दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू आहे.

जम्मू काश्मीर पोलीस दलातील पोलीस शिपाई सलीम शाह यांचे शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी अपहरण करून निर्घृण हत्या केली. शहीद सलीम शाह दक्षिण काश्मीरमधील कुलगामचा रहिवासी होता. पोलीस दलातील जवानांच्या अपहरण करून हत्या केल्याने संपूर्ण काश्मीरमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यांचा मृतदेह कुलगाम परिसरात आढळून आला. सलीम हा कथुआमध्ये कार्यरत असून तो सध्या रजेवर होता. दहशतवाद्यांनी कुलगाम जिल्ह्यातील मुथलामा भागातील सलीमला त्यांच्या घरातून अपहरण केले होते.

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलातील जवानांना अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आलेली ही पहिली घटना नाही. या आधी ईदच्या सुट्टीसाठी परतत असताना दहशतवाद्यांनी मुघल रोडवरून त्यांचे अपहरण केले होते. औरंगजेब हा ४४ राष्ट्रीय रायफल्सचे जवान असून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

 

Related posts

नागरिकत्व विधेयकाविरोधात शहांवर निर्बंध लादण्याची अमेरिकन आयोगाची मागणी

News Desk

पाकिस्तानला नरेंद्र मोदीशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकणार नाही !

News Desk

राहुल गांधींचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार ! नाना पटोले

News Desk