HW News Marathi
मुंबई

वाशी जवळ उलटलेली क्रेन हटवण्याचेकाम अद्याप सुरुच

मुंबई | सायन-पनवेल महामार्गावरील पादचारी पूल हटवण्याचे काम पूर्ण झाले असले तरी उलटलेली क्रेन काम अजून सुरु आहे. याचा परिणाम मुंबईकडे येणाऱ्या वाहतूकीवर झालेला पहिला मिळतो आहे मुंबई कडे येणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे. वाशीकडे जाणारी वाहतूक सध्या तुर्भेमार्गे वळण्यात आली आहे. जुईनगरचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

सायन-पनवेल महामार्गावर नादुरूस्थ अवस्थेत असलेला पादचारी पूर हटविताना क्रेन उलटून अपघात झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली होती. पादचारी पुल हटवण्याचे काम क्रेनच्या मदतीने सुरू होते. पुलाचे वजन अधिक असल्यानं क्रेनची क्षमता कमी पडली आणि दुर्घटना घडली. मानखुर्द जंक्शनपासून वाशीपर्यंत वाहतूक कोंडी झाली.

वाशी खाडीजवळ असलेल्या जकात नाक्यासमोर हा पादचारी पूल हटविण्याचे काम ७ ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणार होते. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास हा पूल हटविण्यासाठी येथील वाहतूक बंद करण्यात आली होती मात्र पुलाचे वजन जास्त झाल्यामुळे क्रेन पुलासह रस्त्यावर उटली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

३० एप्रिल पर्यंत शाळा सुरु ठेवण्याचे पत्रक मागे

News Desk

कुर्ला रेल्वे स्थानकात आत्महात्येचा थरार, सीसीटीव्हीत कैद

swarit

केईम रुग्णालय परिसरातील उघडेबाबावर कारवाई होणार ?

News Desk