HW News Marathi
मुंबई

शास्त्रज्ञ भास्कर दत्त यांचा बेपत्ता मुलगा नमनची नैराश्यामुळे आत्महत्या ?

मुंबई | मुंबईतील भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ भास्कर दत्त यांचा बेपत्ता मुलगा नमन दत्त याचा मृतदेह वाशी खाडीत सापडला आहे. नमन २३ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून बेपत्ता झाला होता. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. नमन हा काही दिवसांपासून नैराश्यात होता. त्याच्यावर नैराश्यातून बाहेर येण्यासाठी वैद्यकीय उपचार देखील सुरु होते. त्यांच्या घरातील एका व्यक्तीच्या निधनामुळे त्याला जबरदस्त धक्का बसला होता.

नवी मुंबईतील सेक्टर १७ मधील अर्चना ज्योती सोसायटीत वैज्ञानिक भास्कर दत्त आणि पत्नी मानसोपचार चंद्रा रामामुर्थी आणि त्याचा मुलगा नमन हे राहत होते. नमन दत्त हा केवळ १७ वर्षांचा होता. घारापुरी बेटावर एलिफंटा गुहांजवळ नमनचा मृतदेह सापडल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट झाली होती त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळीच त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे .

नमन दत्तचे वडील भास्कर दत्त हे २३ सप्टेंबरच्या मध्यरात्री पाणी प्यायला उठले असता त्यांना नमन आपल्या खोलीत नसल्याचे आढळले होते. नमनने त्याला आलेल्या नैराश्यातूनच घर सोडून वाशी खाडीत उडी मारून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. पण ही आत्महत्या आहे कि हत्या असा प्रश्न याबद्दल अद्याप शंका व्यक्त करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शेतकऱ्यांच्या लाँग मार्च मोर्चात मुंबईकर जाती भेद विसरुन मदतीस आले

News Desk

यंदाचा मुंबई श्री किताब परेळच्या अनिल बीलावाने पटकावला

News Desk

मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट

News Desk
मनोरंजन

दीपिकाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी…!

Gauri Tilekar

मुंबई |पद्मावत’ या सुपरहिट चित्रपटानंतर दीपिका पदुकोणचे चाहते तिच्या पुढील चित्रपटाची प्रतीक्षा करत आहे.दीपिकाच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. दीपिकाने ‘पद्मावत’ नंतर कोणताही चित्रपट साइन केला नव्हता. पण आता तिने दिग्दर्शिका मेघना गुलजारचा चित्रपट साइन केला आहे. दीपिका गुलजारच्या आगामी चित्रपटात अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या ‘लक्ष्मी अगरवाल’ची भूमिका साकारणार आहे.

रणवीर सिंगसोबत लग्न करणार असल्याने दीपिकाने कुठलाही प्रोजेक्ट साईन केला नसल्याचे सांगितले गेले होते. पण आता दीपिकाचा हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात दीपिका केवळ लीड रोल साकारणार नसून हा चित्रपट ती प्रोड्यूस देखील करते आहे. अभिनयात दमदार कामगिरी केल्यानंतर दीपिकाने आता निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. मेघना गुलजार या त्यांच्या ‘राजी’, ‘तलवार’ अशा दमदार चित्रपटांसाठी ओळखली जाते. मेघना ‘राजी’नंतर अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या संवेदनशील मुद्यावर चित्रपट घेऊन येत आहेत.

दिल्लीच्या गरीब कुटुंबातील लक्ष्मीला तिच्या मैत्रिणीच्या भावाने मागणी घातली होती. परंतु तिच्याकडून नकार मिळाल्यावर त्याने अ‍ॅसिड फेकून तिचा चेहरा विद्रूप केला होता. लक्ष्मी अगरवालने अ‍ॅसिड हल्ल्याशी झुंज दिलीच पण आता ती अॅसिड हल्ल्यातील पिडीतांसाठी देखील काम करत आहे. २०१४ मध्ये लक्ष्मीला ‘इंटरनॅशल विमेन ऑफ करेज अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे.

Related posts

लवकरच रीगल सिनेमागृह बंद होणार

swarit

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर काळाच्या पडद्याआड

News Desk

कुंभमेळ्यात आगीचे सत्र कायम, बिहारचे राज्यपाल बचावले

News Desk