HW News Marathi
देश / विदेश

पेट्रोलच्या किंमतीत वाढ कायम, डिझेलच्या किंमती स्थिर

मुंबई | देशभरात इंधन दरवाढ थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. मुंबईत आज (शनिवारी) पेट्रोलच्या किंमती ११ पैशांनी वाढल्या आहेत. मुंबईत आता पेट्रोलची किंमती ८९.८० रुपये इतकी झाली आहे. एकीकडे पेट्रोलच्या किंमतीत दर दिवशी वाढ होत असताना दुसरीकडे डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. सलग चौथ्या दिवशी डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी १० सप्टेंबर रोजी मोदी सरकारच्या कार्यकाळात सतत वाढणाऱ्या महागाई विरोधात ‘भारत बंद’ची हाक दिली होती. या आंदोलनाला चांगला प्रतिसाद जरी लाभलेला असला तरी सरकारवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात होणारे रुपयाचे अवमूल्यन तसेच कच्च्या तेलाचे भाव प्रचंड प्रमाणात वाढल्याने देशातील इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली, असे सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहे.

देशभरात अनेक राज्यांत इंधनाच्या किंमतींनी आधीच नव्वदी पार केली असून मुंबईतदेखील लवकरच पेट्रोलच्या किंमती नव्वदी गाठण्याची शक्यता आहे. देशाची राजधानी दिल्लीत देखील पेट्रोलच्या किंमतीत १२ पैशांनी वाढ झाली असून पेट्रोल प्रति लिटर ८२.४४ रुपये एवढे झाले आहे. दिल्लीतही डिझेलची किंमत मात्र ७३.८७ रुपयांवर स्थिर आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अयोध्येतील राम मंदिरासाठी तोगडियांचे बेमुदत उपोषण

News Desk

तिहेरी तलाकवरून सरकार अडचणीत

News Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर; मोदी-शहांची भेट घेणार ?

Aprna
देश / विदेश

भारत दहशतवादाने त्रस्त, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल प्रसिद्ध

Gauri Tilekar

नवी दिल्ली | अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार दहशतवादाचा फटका बसणाऱ्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेकडून प्रत्येक वर्षी दहशतवादाचा फटका बसणाऱ्या देशांची यादी ‘कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम’ या अहवालात प्रसिद्ध करण्यात येते. यावर्षीच्या यादीत इराक पहिल्या, अफगाणिस्तान दुसऱ्या, तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या यादीत गेल्या दोन वर्षांपासून भारत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे धोकादायक दहशतवादी संघटनांचीही यादी तयार करण्यात आली आहे. जगातील दहशतवादी संघटनांचा विचार केल्यास इसिस, तालिबान, अल-शबाब यांच्यानंतर सीपीआय-माओवादी संघटना चौथ्या स्थानी आहेत. भारतात झालेल्या ५३ टक्के हल्ल्यांमध्ये याच संघटनेचा हात असल्याची माहिती अमेरिकेने दिली आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांचादेखील समावेश आहे. २०१७ साली जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर या दहशतवादी मधील मृत व्यक्तींचे प्रमाण तब्बल ८९ टक्क्यांनी वाढले आहे, अशी आकडेवारी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. २०१७ साली भारतात झालेल्या एकूण ८६० दहशतवादी हल्ल्यांपैकी २५ टक्के हल्ले फक्त जम्मू-काश्मीरमध्ये झाले आहेत, अशी आकडेवारी अमेरिकेन सरकारच्या अहवालात प्रसिद्ध केली गेली आहे.

भारतात २०१६ आणि २०१७ या वर्षात माओवाद्यांचे हल्ले कमी झालेले असले तरी या हल्ल्यांतील मृतांची संख्या १६ टक्क्यांनी वाढली आहे. एवढेच नव्हे तर जखमींच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी आकडेवारी अहवालात प्रसिद्ध केली गेली आहे.

Related posts

बुलढाण्यात आणखी १ पॉझिटिव्ह, जिल्ह्यात आता एकूण ४ ‘कोरोना’बाधित

News Desk

…फक्त 10 वर्षांसाठी आरक्षण हवं होतं !

News Desk

सेनेचे संपर्क प्रमुख राहिलेल्या अरविंद सावंत यांच्यावर अवजड उद्योगाची जबाबदारी

News Desk