HW News Marathi
राजकारण

चंद्रकांत पाटलांचा उदयनराजेंना टोला, म्हणाले मैदानात जाऊन धिंगाणा घाला

सातारा | गणपती विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावण्याच्या प्रश्नावर बोलताना, ज्यांना डॉल्बी लावून नाचायचे आहे, त्यांनी मैदानात जाऊन धिंगाणा घालावा, असा टोला सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसलेंना लगावला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉल्बी लावूनच मिरवणूक काढणार असल्याचे उदयनराजेंनी म्हटले होते.

गणेशोत्सवात मोठ-मोठ्याने सिनेमातील गाणी डॉल्बीवर लावण्यापेक्षा भजन लावा आणि जर नाचायचेच असेल तर प्रत्येक गावात एक मैदान असते जिथे जाऊन काय धिंगाणा घालायचाय तो घाला, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. साताऱ्याच्या दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यातील 31 गावांना टेम्भू जलसिंचन योजनेतून पिण्याचे पाणी दिले जाणार आहे. या योजनेचे भूमिपूजन चंद्रकांत पाटील व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता उदयनराजेंना टोला लगावला.

तसेच लोकमान्य टिळकांनी घरातील गणपती चौकात आणला. पण, आता चौकातील गणपती घरात घेऊन जायची वेळ आली आहे, असेही पाटील म्हणाले. दरम्यान, गणपती विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावरणारचं आणि मंगळवार तळ्यात विसर्जन करणारच असा पवित्रा उदयनराजेंनी घेतला आहे. डॅाल्बीने प्रदूषण होतंय तर पुण्यातील सनबर्न फेस्टीव्हलमध्ये प्रदुषण होत नाही का, राज्यातील कंपन्यांच्या प्रदुषणाचे काय? असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मालिकांचा वापर करून छुपा प्रचार करण्याचे भाजपचे मायावी तंत्र, काँग्रेसचा आरोप

News Desk

आता मराठा क्रांती मोर्चा देखील निवडणुकीच्या रिंगणात

News Desk

राजकारणात बदलली उपोषणाची व्याख्या

News Desk
मनोरंजन

शेतक-यांसाठी अजित पवारांचे लालबागच्या राजाला साकडे

News Desk

मुंबई | लालबागच्या राजाचे कुटुंबातील सदस्यांसोबत अजित पवारांनी दर्शन घेतले यावेळी अजित पवार यांनी राज्यातल्या दुष्काळाचे सावट असलेल्या भागांत किमान परतीचा पाऊस तरी चांगला पडावा, असे साकडे गणरायाला घातले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, सदानंद सुळे हे देखील उपस्थित होते.

सालाबादाप्रमाणे यंदाही लालबागच्या राजा चरणी भाविकांसोबतच नेतेमंडळी आणि सेलिब्रिटींची गर्दी सुरुच आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्याचे पहायला मिळाले. प्रथमच सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.

 

Related posts

गणपती विसर्जनसाठी राज्यात २ लाख तर मुंबईत ५० हजार पोलीस तैनात

News Desk

Anant Chaturdashi | “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी ११ दिवस आधीच येणार”

swarit

९ डिसेंबरला विक्रांत सरंजामेचा ‘प्रपोज डे’? 

News Desk