नवी दिल्ली | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांना अजब सल्ला दिला आहे. साखरेमुळे डायबेटीस होतो, त्यामुळे ऊसाचे पीक घेऊ नका अन्य कोणतेही पीक घ्या, असा सल्ला योगी आदित्यनाथ यांनी शेतकयांना दिला आहे. दिल्ली- सहारनपूर महामार्ग कामाच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम बागपत येथे पार पडला. उत्तर प्रदेशातील पश्चिम भागात ऊसाचे उत्पादन सर्वाधिक आहे. मात्र, योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांना ऊसाचेच पीक न घेता इतर कोणतेही पीक घ्यावे, असा सल्ला दिला आहे.
#WATCH: "You must start growing other crops besides sugarcane. Excess production of sugarcane leads to its more consumption, which, in turn causes sugar (diabetes)," says CM Yogi Adityanath at a road inauguration programme in Baghpat.(11.9.18) pic.twitter.com/6dIVAiW9zj
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 12, 2018
ऊसाचे उत्पादन जास्त घेतल्याने साखरेच्या उत्पन्नात वाढ होईल ज्यामुळे डायबेटीस होऊ शकतो. त्यामुळे आता ऊसाचे पीक न घेता भाजीपाल्याचे उत्पादन घेतले पाहिजे, असेही मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे सरकारने ऊसाचे २६ हजार कोटी रुपये वितरीत केले आहेत. उर्वरित १० हजार कोटी लवकरच दिले जातील, असेही त्यांनी नमूद केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.