HW News Marathi
महाराष्ट्र

युवतींनो लढायाला शिका, राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे

जालना | राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेस युवक पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर म्हणाल्या की, युवतींनो लढायला शिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. युवतीनी स्वता: पुढे येऊन लढा देण्याची गरज आहे. मनामध्ये कोणतीही भिती न बाळगता हिमतीने संकटाचा समना करण्यासाठी कंबर कसा, युवतींनो ताट मानेने जगायला शिका,युवतींनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत येऊन समाजिक कार्यात सहभागी व्हावे. मुलींची छेड काढणाऱ्यांना व अश्लील भाषा करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी एकत्रित या,स्त्री शिकली तरच संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते. त्यामुळे आजच्या युवती या उद्याच्या इंदिरा, प्रतिभाताई पाटील आहेत. उद्याचा देश तुमच्या हाताने घडणार आहे. त्यामुळे जिद्दी आणि चिकाटीने यशस्वी वाटचाल करा उद्याचे भविष्य तुमच्याच हातात आहे, असे आवाहन युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख, प्राचार्य डॉ.भागवत कटारे,जिल्हा महिला अध्यक्षा सुरेखा लहाने, जिल्हा युवती अध्यक्षा योगीता चंद,घनसावंगी न.प.नगराध्यक्षा प्राजक्ता देशमुख,जि.प.सदस्या तथा महिला राष्ट्रवादी तालुकाध्यक्षा नितू संजय पटेकर,पं.स.सभापती सरला लहाने, मनिषा जंजाळ, प्रभा विष्णु गायकवाड, पुजा कल्याण सपाटे,ऍ़ड पुजा देशमुख, पं.स.सभापती मंजुषा कोल्हे, पं.स.सदस्या मनिषा काळबांडे,दमयंती कचरु मरकड,शोभा प्रभाकर रणदिवे,शेहनाजबी रहिम पठाण,साजिया शेख,पारुबाई खैरे, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्ष राधा खरपडे,उपाध्यक्ष सरिता अगळे,सचिव वर्षा शिंदे, जि.प.सदस्य जयमंगल जाधव, तालुकाध्यक्ष अंबड भागुजी मैंद, युवक तालुकाध्यक्ष ऍ़ड.अमोल लहाने, संभाजी देशमुख, शहराध्यक्ष अर्जुन भोजने, गौतम ढवळे, अविनाश जाधव,शरद अडागळे, अनिल गिरे,सुदर्शन जाधव, मुजगुले,राजु राठोड आदींची उपस्थिती होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्र्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी समन्स

News Desk

संजय राठोड राजीनामा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला,मुख्यमंत्री स्विकारणार ?

News Desk

राज्याचा अर्थसंकल्प: कोरोनामुळे आरोग्य सेवा सुधारण्याची गरज,आरोग्यसेवेसाठी ७ हजार कोटींचा प्रकल्प

News Desk