HW News Marathi
राजकारण

हार्दिक पटेलने तयार केले स्वत:चे मृत्यूपत्र ?

अहमदाबाद | गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आपले मृत्यूपत्र तयार केले आहे. हार्दीक पटेल यांच्या बेमुदत उपोषणाचा आज नववा दिवस आहे. गेले नऊ दिवस ते उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या नवव्या दिवशी हार्दीक पटेल यांनी हे पत्र जाहीर केले आहे.

मृत्यूपत्रात हार्दिक यांनी त्यांची संपत्ती आई-वडील आणि एका गोशाळेत विभागली आहे. त्यात त्याने आपले डोळे दान करण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. आपला शरिरावर भरोसा नाही म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचे हार्दिकने सांगितले आहे.

पाटीदार समाजाला आरक्षण, शेतकरी कर्जमाफी आणि सहकारी अल्पेश कठिरिया याच्या सुटकेच्या मागणीसाठी हार्दिक गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मराठा समाजावर गरळ ओकणाऱ्या तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा! – नाना पटोले

Aprna

Breaking News | रोहित पवार-रविकांत तुपकरांची बंद दाराआड चर्चा, स्वाभिमानी शेतकरी संघटना ३ जागांवर ठाम

News Desk

मराठा आरक्षणाचा एटीआर आज विधानसभेत मांडणार

News Desk
मुंबई

Dahi Handi | महिला पथकाने मिळवला दादरमधील सेनेची हंडी फोडण्याचा मान

News Desk

मुंबई | दादर येथील नक्षत्र मॉल परिसरातील शिवसेना शाखा क्रमांक. 192 ची मानाची दहीहंडी विक्रोळी टागोर नगर महिला गोविंदा पथकाने फोडली आहे. टागोर नगर महिला पथकाने पाच थरांची विजयी सलामी देत दादरमधील शिवसेनेची मानाची दहीहंडी फोडण्याचा पहिला मान मिळवला आहे. तसेच या महिला पथकाने आयडीएलच्या दहीहंडीलादेखील सलामी दिली. माजी नगरसेवक प्रकाश बबन पाटणकर हे याचे आयोजक आहेत.

टागोर नगर मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या महिला पथकाने एकावर एक असे पाच थर रचून 50 अंक मोजले आणि त्यानंतर हंडी फोडली. यानंतर हे महिला गोविंदा पथक कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे इथल्या मानाच्या हंड्या फोडण्यासाठी सज्ज झाले आहे.

मुंबईत सर्वत्र दहीहंडी उत्सवाचा उत्साह मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. आयोजकांनी आयोजित केलेल्या दहीकाला उत्सवात एका पाठोपाठ अनेक पथके येऊन या साहसी खेळातील आपले कौशल्य दाखवत आहे.

Related posts

राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी अखेर पत्रकारांची दिलगीरी व्यक्त केली

News Desk

बीआरटी टेंडरमध्ये मंत्र्याचा हस्तक्षेप ; मनसेचा आरोप

News Desk

दहावीचा २३ मार्चचा पेपर पुढे ढकलला, ३१ मार्चनंतर पेपरची तारीख करणार घोषित

swarit