HW News Marathi
मुंबई

Parel Fire | बिल्डर सुपारीवालाला पोलीस कोठडी

मुंबई | परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये बुधवारी (२२ ऑगस्ट)ला १२ व्या मजल्याला आज सकाळी ८.३० च्या सुमारास आग लागली होती. या प्रकरणात टॉवरचे बिल्डर अब्दुल रझाक इस्माईल सुपारीवाला याला न्यायालयाने २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावणीली आहे. या टॉवरमध्ये लागलेल्या आगीत चार जणांचा नाहक मृत्यू झाला आहे.

विनोद मयेकर यांनी केलेल्या तक्रारीवरून बिल्डर सुपारीवाला यांना अटक करण्यात आली होती. क्रिस्टल इमारतीमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात आली होती. परंतु ही यंत्रणा बंद असल्यामुळे आग आणखी भडकल्याचेही अग्निशमन दलानी सांगितले.

अग्निशमन आणि विनोद मयेकर या दोघांनी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून अब्दुल रझाक इस्माईल सुपारीवाला या बिल्डरविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी सुपारीवाला यांना ताब्यात घेतले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#26/11Attack : कसाबच्या कुकर्माची दशकपुर्ती

News Desk

डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्त‍ी

News Desk

संगम प्रतिष्ठान करणार गड- किल्ले संवर्धन

News Desk