HW News Marathi
मुंबई

आझाद मैदान येथे सफाई कामगारांचे १५ ऑगस्ट रोजी आंदोलन

मुंबई | आपल्या विविध मागण्या पुर्ण करण्यासाठी सफाई कामगार आदोलन करणार आहेत. गेली अनेक वर्षे मोर्चे आणि आंदोलन कढून देखील त्यांच्या मागण्या पुर्ण झाल्या नसल्यामुळं सफाई कामगार येत्या १५ ऑगस्टला आझाद मैदानात तीव्र आंदोलन करणार आहेत.

मागण्या पुर्ण करण्यासाठी अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस सफाई कामगार सेल, सफाई कामगार मालकी घर हक्क समिती आणि सर्व कामगार संघटनांच्या वतीनं १५ ऑगस्टला आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. तसंच या आदोलनानंतर मागण्या पुर्ण नाही झाल्या, तर जेल भरो आंदोलन करणार, असं अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस संघटनेचे अध्यक्ष गोविंदभाई परमार यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

नेमक्या काय आहेत मागण्या?

– पंजाब राज्य सरकारच्या धर्तीवर सफाई कामगारांना सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी अनुसूचित जातीच्या आरक्षणामधून विशेष आरक्षण देण्यात यावं.

– सफाई काम ही ३५६ दिवस चालणारी अत्यावश्यक सेवा असल्यामुळं सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार ठेकेदारी प्रथा बंद करावी.

– महाराष्ट्र शासनाचा १९८६-१९८७-१९८८ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी.

– ज्या सफाई कामगारांना घरे नाहित अशा कामगारांना १९८८च्या शासन आदेशानुसार ५ टक्के आरक्षित संदनिकांचे वाटप करण्यात यावं.

– ऐवजदार, लेबर कामगार अॅवाड, शवागृहात काम करणारे कामगार, धोबी, स्माशान कामगार, मेन शुअर, पाईपलाईन शुअर, मुख्य मल वाहिन्या, ड्रेनेज वर्क शॉप, स्ट्रेम वॉटर ड्रेन, वाहन स्वच्छक, बाजार विभागातील कामगार, कीटक नाशक फवारणी करणारे कामगार, परिक्षण खात्यातील कामगार, पाणी खात्यातील, खड्डे करणारे कामगार या सर्व कामगारांचा एक वर्ग सफाई कामगार करावा. त्याचप्रमाणं त्यांना शासन आदेशामध्ये सामावेश करून लाड पागे समिती नियमांचे फायदे देणे.

– अनुसूचित जातिचे प्रमाणपत्र देण्याची १०५० ची अट रद्द करून १९६० हि वास्तव्याची अट शासन आदेश २००४ नुसार करण्याचा शासन आदेश काढावा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारच्या कारभारावर जनतेचा भरोसा राहीला नाही

News Desk

आरे कारशेड प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी , झाडे तोडणे सुरूच असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप

News Desk

युतीच्‍या चर्चेला आजपासून सुरूवात – मुंबई भाजपा अध्‍यक्ष आशिष शेलार

News Desk