HW News Marathi
महाराष्ट्र

१५ ऑगस्टपासून मराठा समाजाचे ‘अन्नत्याग’ आंदोलन

मुंबई | मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी १५ ऑगस्टपासून ‘अन्नत्याग आंदोलन’ करणार करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. यापुढे मराठा समजा रस्त्यावर आंदोलन न करण्याची मोठी घोषणा मराठा क्रांती समितीने केली.९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. परंतु या बंदला हिंसक वळण लागले. त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती समितीने औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद बोलवली होती.

मराठा समाज आणि आंदोलनाला बदना करण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चा समितीने यावेळी केला. तसेच मराठा तरुणांवर जे गुन्हे दाखल केले आहेत. ते सर्व गुन्हे १५ ऑगस्टपर्यंत सरकारने मागे घ्यावे, असा इशारा देखील समितीने यावेळी दिला आहे.

वळूज एमआयडीसीतील ज्या कंपन्यांची तोडफोड झाली आहे. त्या कंपन्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी चेक करावे, आंदोलनात तोंड बांधून तोडफोड करण्यात आली. याआधी मराठा आंदोलकांनी तोडफोड केली नाही, मग आताच का असे झाले? तसेच या तोडफोडीची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली.

महाराष्ट्र बंदला हिंसक वळण

मराठा आंदोलकांनी निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली. पुण्यातील चांदणी चौकातही जमाव हिंसक झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार सुरू केला. चांदणी चौकातील परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. औरंगाबादमध्ये ही आंदोलकांनी २ खासगी वाहने पेटवली. पोलिसांनी आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आश्रूधुराचा वापर करून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरक्षण मिळावे या मताचे नाहीत – नारायण राणे

News Desk

भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पराकाष्ठा करावी

News Desk

धान्यवाटप विनातक्रार होण्यासाठी पालकमंत्र्यांनी व्यक्तीश: लक्ष घालून जबाबदारी घ्यावी

News Desk
देश / विदेश

बँकेपेक्षा जास्त व्याज देईन | नितीन गडकरी

swarit

नवी दिल्ली | माझ्याकडे गुंतवणूक केली तर बँकेपक्षा जास्त व्याज देऊन, असे विधान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. तुम्ही राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय)च्या बॉण्डमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला बँकांपेक्षा जास्त व्याज मिळेल, असे नितीन गडकरी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या २५ व्या वर्षाच्या कार्यक्रमात बोलत होते.

पुढे असे देखील म्हटले की, आमचे टोल कलेक्शन चांगले आहे. आमची रेटिंग ट्रिपल ए आहे. भारतात गुंतवणूकदारांना बँकेडून जेवढे व्याज मिळते. त्या पेक्षा जास्त व्याज मी देऊ शकतो, असे गडकरी म्हणाले. तसेच रस्त्यांबरोबरच शिपिंगमध्येही तुम्ही गुंतवणूक करू शकता कारण आमची पोर्टही फायद्यामध्ये आहेत, असा सल्ला गडकरींनी दिला. एनएचएआयला बॉण्डच्या माध्यमातून ६३ हजार कोटी रुपये जमा करायचे आहेत. मागच्या वर्षी एनएचएआयने ५२ हजार कोटी रुपये जमा केले होते.

Related posts

उर्जित पटेल यांच्याबाबत तुम्हाला या गोष्टी माहित आहेत का ?

News Desk

शबरीमाला हिंसाचार प्रकरणी २,०६१ जणांना अटक

swarit

२०२०चा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना जाहीर

News Desk