HW News Marathi
महाराष्ट्र

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत यांचा झाला विजय ?

सांगली | मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहेत. पालिका निवडणुकीची मतमोजणीला आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या २० प्रभागातील ७८ जागांसाठी १ ऑगस्टला मतदान झाले आहे.

आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची नावे

प्रभाग १ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे शेडजी मोहिते, राईसा रंगरेज, पदमश्री पाटील, विजय घाडगे उमेदवार विजयी झाले आहे. तर प्रभाग ३ मधून अनिता मोहन व्हणकंडे, शिवाजी बाबुराव दुर्वे, शांता रघुनाथ जाधव आणि संदीप सुरेश आवटी हे भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग ४ मध्ये निरंजन आवटी, पांडुरंग कोरे, अस्मिता सलगर, आणि मोहना ठाणेदार भाजपचे उमेदवार विजयी.

प्रभाग ६ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नर्गिस सय्यद, मेनुद्दीन बागवान, रजिया काजी, अथहर नायकवडी विजयी झाले आहे. प्रभाग ७ मध्ये भाजपचे देवमाने आनंदा, खोत संगीता, कुल्लोली गायत्री, आणि माळी गणेश तर प्रभाग १५ मधून मंगेश चव्हाण आणि फिरोज पठाण ही पालिका निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या विजयी उमेदवारांची नावे आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘..तेव्हा संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते’, नितेश राणेंचा संजय राऊतांवर निशाणा

News Desk

एकनाथ खडसेजी, तुम्ही खात्री बाळगा !, अमृता फडणवीसांचे ट्विट

News Desk

माजी सहकारमंत्री विलासकाका उंडाळकर यांना अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची श्रद्धांजली

News Desk
मनोरंजन

‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाच्या दिग्दर्शक विजय रत्नाकर गुट्टे यांना अटक

swarit

मुंबई | ‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाचे दिग्दर्शक विजय रत्नाकर गुट्टे यांना अटक करण्यात आली आहे. गुट्टे यांच्यावर ३४ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी जीएसटीच्या इंटेलिजन्स विंगने त्यांना बेड्या ठोकल्या आहे. गुट्टे यांना जीएसटी कायद्याच्या कलम (१) (क) अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

विजय गुट्टे हे वीआरजी डिजिटल कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची मालकी असून या कंपनीने ३४ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. गुट्टे तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसल्याचे सांगितले जात आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडी असून १४ ऑगस्टपर्यंत ऑर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे.

गुट्टेच्या कंपनीने ऍनिमेशन आणि मनुष्यबळासाठी दुसऱ्या कंपनीकडून (हॉरिजॉन आऊटसोर्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड) ३४ कोटी रुपयांचे खोटे इनव्हॉईस घेतले. विशेष म्हणजे हॉरिजॉन आऊटसोर्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर आधीच जीएसटीचा भरणा करताना 170 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना गुट्टेकडून सहकार्य केले जात नाही.

विजय गुट्टे यांचा अल्प परिचय

विजय गुट्टे हे रत्नाकर गुट्टेचे पुत्र आहे. रत्नाकर यांच्यावर ५५०० कोटींच्या बँक घोटाळ्याचा आरोप आहे. रत्नाकर हे परभणीतील गंगाखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.

‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’

प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असेलला असेलला ‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांनी मनमोहन सिंग यांची भूमिका साकारली आहे.

Related posts

विनोद खन्ना यांची प्रकृती खालावली

News Desk

Vijay Diwas : भारत – पाक युद्धाचे परिणाम

News Desk

प्रियंका चोप्रा-निक जोनस यांचा जुलै-ऑगस्टमध्ये साखरपुडा

News Desk