HW News Marathi
मनोरंजन

कलावंत हीच माझी जात | नाना पाटेकर

मुंबई | राज्यात सध्या सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या राजकारणाला उद्देशून बोलताना मला आजपर्यंत कोणी माझी जात विचारली नाही, असे म्हणत अभिनेते नाना पाटेकर यांनी जातीवादावर बोट ठेवले. ते विले पार्लेतल्या विद्यानिधी इन्फोटेक अॅकॅडमीच्या नामकरण सोहळ्यात बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले मी शाळेत होतो तेव्हापासून आजपर्यंत मला कोणी माझी जात विचारली नाही. पण आजची परिस्थिती पाहून वैष्यम्य वाटते. कलावंत हीच माझी जात आहे. लोकांनीही मला कलावंत म्हणूनच स्वीकारले, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, मला आजपर्यंत माझी जात सांगायची गरजही वाटली नसल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अमित शहा स्वातंत्र्यदिनी श्रीनगरमधील लाल चौकात फडकविणार तिरंगा ?

News Desk

अनिकेत विश्वासराव, प्रार्थना बेहेरेच्या गाडीला लोणावळ्याजवळ अपघात

News Desk

पारंपारीक पोर्तुगीज कलकल

News Desk
महाराष्ट्र

आज मंगळ ग्रह पृथ्वीच्या अधिक जवळ

swarit

मुंबई | अंगारकी चतुर्थी ही मंगळवारी असा दुहेरी योग जुळून आल्याने भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे. परंतु मंगळवारी (३१ जुलै) आजचा दिवस अजून एका कारणामुळे खास मानला जातो. ते म्हणजे मंगळ ग्रह हा पृथ्वीच्या अधिक जवळ म्हणजे ५ कोटी ७५ लाख किलोमीटर अंतरावर येणार असल्याने खगोलप्रेमी मंडळींना मंगळ निरीक्षणाची संधी मिळणार आहे.

सूर्याभोवती परिभ्रमण करीत असताना सूर्यमालेतील ग्रह एकमेकांपासून कमी-अधिक अंतरावर येत असतात. मंगळ ग्रह जेव्हा पृथ्वीपासून सर्वात दूर असतो, तेव्हा ते अंतर तब्बल ४० कोटी १० लाख किलोमीटर इतके असते. सध्या मात्र तो तुलनेने बराच जवळ आला आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. साध्या डोळ्यांनी रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात उत्तराषाढा नक्षत्रात मंगळ ग्रहाचे सुंदर दर्शन घडते. तो रात्रभर आकाशात पाहता येतो.

मंगळ ग्रह लालसर रंगाचा असल्याने सहजपणे ओळखता येतो. यापूर्वी १५ वर्षांपूर्वी २७ ऑगस्ट २००३ रोजी मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ म्हणजे ५ कोटी ५७ लक्ष किलोमीटर अंतरावर आला होता. आता यानंतर पुन्हा १७ वर्षांनी ११ सप्टेंबर २०३५ रोजी मंगळ पृथ्वीच्या जवळ ५ कोटी ६९ लक्ष किलोमीटर अंतरावर येणार आहे, अशी माहितीही सोमण यांनी दिली.

Related posts

हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणार, सोमय्यांचं वक्तव्य!

News Desk

राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता!

News Desk

राजभवन आता कॅनव्हासवर : राजभवन येथील कार्यशाळेला राज्यपालांची भेट

Aprna