मुंबई। मशिदीवरील लावलेले भोंगे हटवण्याचा निर्णय राज्या सरकारला घ्यावा लागेलच. जर सरकाने हा निर्णय घेतला नाही. तर मशिदीबाहेर भोंगे लागतील, तर त्यांच्यासमोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालीसा लावावी, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकासआघाडी सरकारला दिला आहे. तब्बल दोन वर्षानंतर आज (एप्रिल) गुढीपाडवा निमित्ताने दादर शिवाजी पार्कमध्ये मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या निकाल, महाविकासआघाडीची स्थापना, जेलमध्ये राहिलेले लोक मंत्री झाले, सरकारमधील दोन मंत्री तुरूंग आदी मुद्यांवर सरकारला घेरले.
दरम्यान, राज ठाकरे म्हणाले, “माझा कोणत्याही धर्माच्या प्राथनेला विरोध नाही. परंतु, मशिदीवरील लावलेले भोंगे हे खाली उरवण्याचा निर्णय राज्या सरकारला घ्यावा लागेलच. जर सरकाने हा निर्णय घेतला नाही. तर मशिदीबाहेर भोंगे लागतील, तर त्यांच्यासमोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालीसा लावावी. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे. कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा उल्लेख नाही. जेव्हा धर्म तयार झाला. तेव्हा लाऊडस्पीकर अस्तित्वात होता का? , बाहेरच्या देशात जाता. तिथे कोणत्याच मशिदीवर लाऊडस्पीकर नसतो. तुम्हाला प्रार्थना करायची असेल तर ती तुमच्या घरात करा, असे परदेशातील शासन आहे.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.