HW News Marathi
मुंबई

रस्त्याच्या दुरावस्थेप्रकरणी पालिकेकडून कंत्राटदारांवर करवाई

मुंबई | घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडच्या रस्त्यांच्या दुरावस्थेनंतर महापालिकेने कंत्राटदारांवर कारवाई करत १ लाख रुपयांचा दंड आकारला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा रस्त्यांच्या खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंग रोडची देखभाल करण्याची जबाबदारी ही बीपीएससीपीएल आणि विशाल कन्स्ट्रक्शन यांच्या जॉईट व्हेन्चरची होती. या रस्त्याची देखभाल योग्य पद्धतीने न केल्यामुळे त्यांना पालिकेने एक लाख रुपयांचा दंड आकारला आला आहे.

ही दुरवस्था पाहूण पालिकेने आतापर्यंत कंत्राटदारांवर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली होती. परंतु आता कंत्राटदारांना चार दिवसांची मुदत देत एक लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील तीन किलोमीटर पॅचची अवस्था भीषण आहे. या भागात जागोजागी खड्डे असल्याच्या अनेक तक्रारी पालिका आयुक्तांकडे आल्या आहेत. यानंतर पालिका आयुक्तांनी एक बैठक आयोजित करून हा निर्णय घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई, उपनगर, वसईसह पालघरमध्ये जोरदार पाऊस

News Desk

मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांची क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार

News Desk

कासकरच्या हस्तकांनी खंडणीतील सोने उधळले बारबालांवर

News Desk
महाराष्ट्र

भिमा कोरेगावचे पडसाद उल्हासनगरात . संपुर्ण शहर बंद .

News Desk

उल्हासनगर : १ जानेवारी रोजी भिमाकोरे गांव येथे जातीयवादी समाजकंटकानी स्तंभाला अभिवादन करन्यासाठी आलेल्या भिमसैनिकांवर दगडफेक करुन गाड्या जाळल्याचा अमानुष प्रकार केल्याने संतप्त झालेल्या आंबेडकरी समाजाने उल्हासनगर शहर बंद केले आहे . तर शहरात पोलिस बंदोबस्त वाढविन्यात आला असुन कोणताही अनुचित प्रकार घडला नाही .

भिमाकोरे गांव येथे स्तंभाला अभिवादन करन्या करिता येणाऱ्या बहुजन बांधवांवर तेथिल जातीयवादी समाजकंटकानी इमारतीच्या गच्चीवरुन दगडफेक करुन नंतर गाड्या जाळण्याचा अमानुष प्रकार केला . तर महीला लहान मुलांवर ही दगडफेक केल्याने याचे पडसाद सर्वत्र पसरले आहे . त्यामुळे येथिल आंबेडकरी समाजाने रस्त्यावर उतरुन उल्हासनगर शहर बंद केले आहे . शहरातील रिक्षा चालकानी देखिल या बंद मध्ये सहभागी होवुन रिक्षा बंद ठेवल्या आहेत . तर पोलिसानी शहरभर चोख बंद ठेवल्याने कोणता ही अनुचित प्रकार घडला नाही .

Related posts

“योगींनी फक्त मशिदीवरील नाही तर यूपीमध्ये मंदिरावरील भोंगे देखील बंद,” अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

Aprna

‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून अण्णांची जनजागृती सुरू

News Desk

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा मागासवर्गीय आयोगाकडे

News Desk