HW News Marathi
देश / विदेश

नवाज शरीफ आणि मुलगी मरियमला विमानतळावर अटक

लाहोर | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम शरीफ यांना लाहोर विमानतळावर अटक करण्यात आली आहे. हे दोघेही लंडनहून अबुधाबीमार्गे लाहोरला पोहोचले. तेव्हा पाकिस्तानामधील एएनबीने त्यांनी या दोघांना अटक केली. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात न्यायालयाने या दोघांना दोषी ठरविले असून अटक केल्यानंतर विशेष विमानाने इस्लामाबादला नेण्यात आले.

नॅशनल अकाउंटेबिलिटी न्यायालयाने शरीफ यांना दहा वर्षाची आणि त्यांची मुलगी मरियम यांना सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर शरीफ यांना १ कोटी डॉलर, तर मुलीला २६ लाख डॉलरचा दंड ठोठावला. तसेच पाकिस्तानमध्ये जुलै महिन्याच्या २५ तारखेला सार्वत्रिक निवडणूक होणार असून मरियाम लाहोरमधून निवडणूक लढविणार आहे.

शरीफ यांच्या अटकेच्या पाश्वभूमीवर पाकिस्तानामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाला असून लाहोरमध्ये काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने विमानतळ परिसरात जमले होते. तर काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत. पाक पोलिसांनी ३७८ जणांना ताब्यात घेतले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींच्या सरकारचा पहिला निर्णय शहीद जवानांच्या मुलांसाठी

News Desk

… तशी भाषा शत्रू राष्ट्रांचे नेतेसुद्धा बोलू शकत नाही !

News Desk

#NirbhayaCase : ४ आरोपींना १ फेब्रुवारीला सकाळी ६ वा, होणार फाशी

swarit