HW News Marathi
मुंबई

गोखले पूल दुर्घटनेनंतर राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोपच्या फैरी

मुंबई | अंधेरी रेल्वे स्टेशन जवळील गोखले पुलाचा काही भाग मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. या घटनेत एकूण ६ जण जखमी झाले आहेत. पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

पूल दुर्घटनेनंतर रेल्वे आणि पालिकेने हात झटकले

या दुर्घटनेनंतर गोखले पूल रेल्वे की पालिका कोणाच्या अंतर्गत येतो. यावरुन राजकारण पेटतानाचे चित्र दिसत आहे. गोखले पूल हा मुंबई महापालिके अंतर्गत येतो, असे प्रशासनाने पत्रकाद्वारे म्हटले आहे. तर गोखले पुलाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी रेल्वेची असून या दुर्घटनेसाठी रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे. असा आरोप महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. कोसळलेला पूल हा मुंबई महापालिकेने बांधला आहे. त्याच्या देखभालीचे काम मुंबई महापालिकेने करणे आवश्यक होते’, असे म्हणत भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी महापौरावर निशाणा साधला आहे.

नेतेमंडळींची ट्विटर वॉर

विधानपरिषदेचे विरोधी नेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅडलवर ट्विट करत म्हटले की, मुंबईतून लाखो कोटी रुपयाचा निधी केंद्र सरकारला मिळतो. परंतु मुंबईकरांच्या मूलभूत सुविधांवर मात्र खर्च केला जात नाही, असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

पालिकेने मुंबईकरांच्या अपेक्षाभंग केला असल्याचा आरोप मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिरे यांनी केला आहे. अहिरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅडलवर ट्विट करुन शिवसेनेवर टीका केली आहे.

 

मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नाही तर सुरक्षित लोकल प्रवासाची गरज आहे, असे बोलून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला.

गोखले पूल दुर्घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपच्या फैरी झडताना पाहयला मिळाला. सर्व राजकीय नेते मंडळी मुख्य प्रश्नांना बदल देताना दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

म्हाडाच्या घरांसाठी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध

News Desk

वाशी जवळ उलटलेली क्रेन हटवण्याचेकाम अद्याप सुरुच

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

News Desk