HW News Marathi
मुंबई

मुंबईकरांसाठी आजचा दिवस अपघाताचा ठरला

मुंबई | मुंबईकरांसाठी मंगळवार ३ जुलै हा अपघाताचा दिवस ठरला आहे. अपघाताची सुरुवात सकाळी साडेसात वाजता अंधेरी रेल्वे स्टेशनजवळील गोखले पुलाचा काही भाग कोसळला. यानंतर सांताक्रूजमध्ये डबल डेकर बसचा अपघात झाला. तर मीरा रोड रेल्वे स्थानकाच्या नवीन तिकीट घराला आग लागली आहे. तसेच कमला मिल कंपाऊंडमधील इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या चार घटनांनी संपूर्ण मुंबई हादरुन गेली.

गोखले पूल दुर्घटना

अंधेरी रेल्वे स्टेशन जवळील गोखले पुलाचा काही भाग मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. या घटनेत एकूण ५ जण जखमी झाले आहेत. पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या दुर्घनेत जखमी झालेल्यांना प्रत्येकी १ लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे.

डबल डेकर बसचा अपघात

मुंबईतील सांताक्रुझमध्ये डबल डेकर बसचा विचित्र अपघात झाला आहे. ओव्हरहेड रेलिंगला बसचा वरील भाग धडकून हा अपघात झाला आहे. परंतु सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. वांद्याहून कलिना विद्यापीठाच्या दिशेने जाताना सांताक्रुझजवळ हा अपघात झाला आहे. या रस्त्यात ठराविक उंचीखालील वाहनांनाच प्रवेश असल्यामुळे येथे बॅरिकेट लावण्यात आले होते. परंतु या बॅरिकेटवर डबल डेकर बस धडकली.

मीरा रोड रेल्वे स्थानकाच्या तिकीट घराला आग

मीरा रोड रेल्वे स्थानकाच्या नवीन तिकीट घराला आग लागली होती. या आगीत कोणत्याही प्रकारची जिवित हाणी झाली नाही. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात अग्निशन दलाला यश आले.

कमला मिल कंपाऊंडमध्ये आग

कमला मिल कंपाऊंडमधील इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत कोणीही जखमी झाले नसून वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशन दलाला यश आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपकडून जाहिरातबाजीवर 500 कोटींचा खर्च – नवाब मलिक

News Desk

प्रजासत्ताक दिन: राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना, नागरिकांना संबोधन

News Desk

आरे परिसरात अग्नितांडव

News Desk