HW News Marathi
महाराष्ट्र

यशवंत जाधव प्रकरणी आयुक्त इक्बालसिंह चहल आयकर विभागाच्या रडारवर

मुंबई | राज्यातील महाविकास आघाडीतील अनेक नेते व मंत्री ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आलेले असताना मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना इन्कम टॅक्स खात्याने नोटीस बजावली आहे. शिवसेनेचे बडे नेते तथा माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव प्रकरणी चौकशीसाठी हे समन्स बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्या 3 मार्च रोजीच महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावरील कारवाई संदर्भात ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापालिका आयुक्तांना आयकर विभागाने समन्स बजावल्याने मोठी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, इक्बालसिंह चहल यांना 3 मार्चला नोटीस बजावली आहे. यशवंत जाधव प्रकरणी चौकशीसाठी समन्स 10 मार्चला हजर राहण्यासाठी हे समन्स पाठवले होते.

एप्रिल 2018 ते मार्च 2022 पर्यंत स्थायी समितीने जे-जे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले, जे ठराव पास झाले त्याची सर्व कागदपत्रे घेऊन आयकर विभागाने या आधीच आयुक्त चहल यांना बोलावले होते. आता पुन्हा एकदा यासंबंधी त्यांना बोलावण्यात आले आहे. या चार वर्षांमध्ये जे काही कॉन्ट्रॅक्ट्स देण्यात आले. त्या सगळ्यामध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा संशय हा आयकर विभागाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जलसंपदा मंत्री जयंत पाटील चाळीसगांव भागात नुकसानीची करणार पाहणी!

News Desk

ममता बॅनर्जी आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट!

News Desk

“फसवणूकीने तुम्ही सत्तेवर आलात, आलाच आहात तर स्वकर्तृत्वही दाखवा”, भाजपने मुख्यमंत्र्यांना सुनावले

News Desk