HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप महाराष्ट्रामध्ये पुन्हा येणार नाही; पवारांनंतर राऊतांचा पुरुच्चार

मुंबई | भाजप महाराष्ट्रामध्ये पुन्हा येणार नाही, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावाल आहे. फडणवीसांनी गोव्यात भाजपचा विजय आणल्यामुळे त्यांचे काल (१७ मार्च) नागपुरात रोड शो केला आणि यानंतर उपस्थितांना संबोधिक केले. तेव्हा फडणवीस म्हणाले, “२०२४ मध्ये महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार आहे, असे विधान केले होते. फडणवीसांच्या वक्तव्याला राऊतांनी आज (१८ मार्च) पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 

शरद पवार यांनी महत्वाचे विधान केले की येत्या काळात ते भाजपला येऊ देणार नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचल्यावर राऊत म्हणाले, “नाही कोणीही घाबरत नाही. भाजपला वाटत असेल की, केंद्रीय तपास यंत्रणा, खोटे आरोप आणि चिखल फेक हे करून महाविकासआघाडीचे आमदार, खासदार आणि  नेते यांचे मनोबदल ते खाली आण्याचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे आहे. असे होणार नाही, हे आपण पहात आहात. आम्ही किती मजबुतीने उभे आहोत. काल शरद पवारांनी जे सांगितले आहे. तो विश्वास दिलेला आहे की, घाबरु नका मी पुन्हा भाजपला महाराष्ट्रात येऊ देणार नाही. हे त्यांचे विधान आणि भूमिका फक्त राष्ट्रवादी पक्षांची नाही तर महाविकासआघाडीच्या वतीने सुद्धा त्यांनी ही भूमिका मांडली. मग शिवसेना, राष्ट्रवादी असेल महाविकासआघाडीचे प्रमुख नेते त्यांनी तरुण आमदारांसमोर ही भूमिका मांडली आहे. आमचे भाजपमध्ये मित्र रोज ज्या तारखा देत आहेत.  जे रंग उधळत आहेत. नकली रंग आहेत, अशा नकली रंगांवर बंदी आहे. केंद्र सरकारची सुद्धा, त्यामुळे काल पवारसाहेबांनी सुद्धा त्यांना उत्तर दिले आहे. काही झाले तरी भाजप महाराष्ट्रामध्ये पुन्हा येणार नाही. ठिका आहे प्रयत्न करायला हरकत नाही. लोकशाहीमध्ये प्रयत्न करत राहिले पाहिजे.” 

“रेड हा भाजपचा आवडता रंग आहे. रेड हा अवडता रंग म्हण्यापेक्षा ही तर भेसळ आहे म्हणा, यात भेसळ आहे. यात भाजप भेसळीचे रंग वापरतात. शुद्ध रंग वापरा, आणि तुमच्या त्या भेसळीच्या रंगाची आम्हाला भिती पण वाटत नाही. रेड असेल तर काही असेल, होळी ही वर्षातून एकदा येते, पण भाजपचा शिमगा रोज असतो. यांचा शिमगा रोज सुरू असतो. आम्ही जर रोज यांचा शिमगा करायला सुरुवात केली. तर महाराष्ट्रा सुद्धा खूप खड्डे खोदलेले आहेत. आणि या खड्ड्याक कोण पडेल आणि कोणाला ढकले जाईल, हे तुम्हाला हळूहळू दिसेल,” राऊतांनी म्हटले. 

  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझ्यासारखा मुख्यमंत्री असता तर कडू यांचा राजीनामा मागितला असता, प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

News Desk

कोल्हापुरात अजित पवार आणि श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट, मालोजीराजेही उपस्थित

News Desk

मुंबईत भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले; तणावाचे वातावरण

News Desk