HW News Marathi
देश / विदेश

Russia-Ukraine War: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या हत्येचा कट

मुंबई | रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आजचा (२८ फेब्रुवारी) पाचवा दिवस आहे. या युद्धाच्या सुरुवातीला असे वाटत होते की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे सैन्य लवकरच हार मानतील. पण, तसे झाले नाही. आता तर युक्रेनचे नागरिक देखील रणांगणात उतरले आहेत. युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या हत्येचे आदेश दिला आहे, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितलं आहे.

टाइम्सच्या रिपोर्टनुसार, झेलेन्स्की यांना मारण्यासाठी आफ्रिकेतून युक्रेनमध्ये ४०० हून अधिक भयंकर मारेकरी पाठवण्यात आले आहेत. असे वृत्त आहे की व्लादिमीर पुतिन यांनी झेलेन्स्की आणि इतर २३ सरकारी अधिकार्‍यांची हत्या करण्यासाठी वॅग्नर ग्रुप नावाचे खाजगी मिलिशिया युक्रेनला पाठवले आहे.

युक्रेनमध्ये रशियाचा हल्ला सातत्याने वाढत आहे. रशियन सैन्याने युक्रेनमधील अनेक शहरे ताब्यात घेतली आहेत. युक्रेनच्या प्रमुख शहरांवर क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ले केले जात आहेत. तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी असा दावा केला आहे की, मी शत्रूच्या म्हणजेच रशियाच्या पहिल्या टार्गेटवर आहे आणि माझे कुटुंब दुसऱ्या टार्गेटवर आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, रशियन सैनिक पूर्ण ताकदीनिशी राजधानी कीव ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ते पाहता युक्रेननेही रशियासमोर गुडघे न टेकण्याचा निर्णय घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नेपाळ लिपुलेख, कालापानी हा नेपाळचाच भाग असल्याचा नकाशा प्रकाशित करणार

News Desk

प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन

swarit

मोदींना ‘आयुष्यमान भारत’ योजनेसाठी नोबेल द्यावा | डॉ. तमिलीसाई सुंदरराजन

swarit