HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी, लाठ्या-काठ्यांनी तरुणांची मारहाण, तणावपूर्ण शांतता!

बीड | बीड शहरात आज सकाळी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये वाद सुरु झाला. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. काही वेळानं तरुणांनी लाठ्या-काठ्यांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली. शहरातील मध्यवर्ती भागात भर रस्त्यात दोन गटात हा वाद सुरु होता. यामुळे वाहतूक बराच वेळ खोळंबून राहिली. तरुणांनी हातात काठ्या घेतल्यानं या घटनेची माहिती तत्काळ पोलीसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हा वाद शांत करण्यात आला. तोपर्यंत बीडमध्ये या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं.

बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घटना घडली. घटनास्थळी दाखल असलेल्या प्रत्यक्ष दर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, झेंडा विक्रीवरून या वादाला सुरुवात झाली. पाहता पाहता दोन गट या वादात परस्परांशी भिडले. लाठ्या काठ्यांनी भर रस्त्यावरच दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. अचानक दोन गट आमनेसामने आल्याने थोडा काळ तणाव झाला, शिवाय वाहतूक देखील बऱ्याच काळ खोळंबून राहिली. तब्बल पंधरा मिनिटानंतर दोन्ही गटातील वाद शांत झाला.

शहरात तणावपूर्ण शांतता

बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी वाद शमवला आहे. मात्र काही काळ येथील वातावरण तणावपूर्ण होते. जवळपास पंधरा मिनिटे येथील वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. जमाव पांगल्यानंतर शिवाजी चौकातील वाहतूक सुरळीत झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शरद पवारांबाबतची अशी वक्तव्य इथून पुढे खपवून घेतली जाणार नाही”, लंकेंनी घेतला पडळकरांचा समाचार

News Desk

गोरक्षणाच्या नावावर माणसं मारणाऱ्यांना कठोर शिक्षा करा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

News Desk

‘बेस्ट’ला आर्थिक बळकटी देण्यासाठी तिकीट स्वस्त

News Desk