HW News Marathi
देश / विदेश

महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव; राऊतांचा पत्रातून गौप्यस्फोट

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे.  महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे, असा खळबळजनक आरोप राऊतांनी केला आहे. या प्रकरणात उपराष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली आहे. माझ्या मुलीच्या लग्नात काम करणाऱ्या डेकोरेशन वाल्यांना ईडीने धमकावले. आणि ईडीचा वापर करत विरोधकांना धमकाल्याचे काम सुरू असल्याचा आरोप राऊतांनी पत्रातून केला आहे, अशा गौप्यस्फोट देखील त्यांना पत्रात केला आहे. 

राऊतांनी पत्रा म्हटले, “महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे. आणि महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला असून राज्यात मध्यावर्धी निवडणूक करण्यासाठी प्रसत्न करत आहे. मात्र, मी या सर्वांना नकार दिल्याचेही स्पष्ट केले आहे. ठाकरे कुटुंबिय, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री, महाविकासआघाडी आणि राज्यातील इतर नेत्यांशी चर्चा झाली आहे. हुकूमशाही पद्धतीने राज्य करणाऱ्यांना बद्दल बोलावे लागेल,” असे ते म्हणाले.

दरम्यान, “महाराष्ट्रातील सरकार पाडाण्यास मदत नाही केली तर मोठी किंमत चुकवाली लागेल, अशी धमकी मला त्यांनी दिली होती. माझ्याबरोबरच महाराष्ट्रातील दोन कॅबिनेट मंत्री आणि दोन वरिष्ठ नेते यांच्यावर सुद्धा पीएमएलए कायद्याअंतर्गत तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती, असा उल्लेख राऊतांनी पत्रातून दिला आहे. गेल्या काही दिवासांपूर्वी पवारांच्या कुटुंबाकडे ईडीचे लोक पाच दिवस बसले होते. तसेच काहीसे आमच्या बाबतीतही घडत असून भाजप नेते दररोज मला आणि अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ कोठडीत जावेल लागेल, अशी धमकी देत आहेत. परंतु, त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की, आमच्या मागे त्यांनाही कोठडीत जावे लागेल, कारण, तुमची पापे जास्त आहेत. तुम्हाला ईडीद्वारे ज्या कायदेशीर कारवाया करायच्या आहेत, त्या काव्यात. पण, मी सुद्धा ईडीच्या कार्यालयात काय सुरू आहे, याची पोलखोल करणे,” असे राऊत पत्रात म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोबाइलसाठी मेजरला झाडल्या गोळ्या, सिमेवर जवानाकडून धक्कादायक कृत्य

News Desk

भाजपा नेते अश्विनी उपाध्याय दिल्ली पोलिसांच्या ताब्यात!

News Desk

मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर

News Desk