HW News Marathi
महाराष्ट्र

राजकीय नेत्यांसंबंधी केलेलं ‘ते’ वक्तव्य बंडातात्यांना भोवलं; पोलिसांनी घेतलं ताब्यात

सातारा | किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देण्याच्या या राज्य सरकारच्या निर्णयावर विरोधी पक्षांनी विरोध दर्शवला आहे. तर काही संघटना सुद्धा याला विरोध करताना दिसत आहेत. अशातच कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध करताना बंडातात्या यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यात वाद निर्माण झाला आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे सर्वत्र त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. तर आता विनापरवानगी आंदोलन करून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी बंडातात्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतलं आहे.

साताऱ्यात सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करताना बंडातात्या कराडकर यांनी दारु आणि राजकीय नेत्यांविषयी वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर रोष व्यक्त करण्यात येत होता. बंडातात्यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुण्यात आंदोलन करण्यात आलं. तसेच जर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर कोर्टात जाऊन खटला दाखल करण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला होता. याशिवाय महिला आयोगानेही बंडातात्यांच्या वक्तव्याची दखल घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास सांगितलं होतं. दरम्यान, कराडकर यांनी या प्रकरणी माफी देखील मागितली आहे. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली असून त्यांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी आता त्यांची चौकशी होणार असल्याचं म्हंटलं जात आहे.

काय म्हणाले होते बंडातात्या कराडकर?

बंडातात्यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बंडातात्यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले हे रस्त्यावर दारू पिऊन पडतात. तसेच याचे पुरावे सुद्धा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावेळी त्यांनी काही नेत्यांची नावं देखील घेतली. तसेच त्यांनी महिला नेत्यांविषयीही वादग्रस्त टिप्पणी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांच्या एकत्र पुतळ्याने शहराच्या वैभवात वाढ! – दत्तात्रय भरणे

Aprna

जोरजबरदस्तीने जशाच्या तशा हा कृषी कायदा राज्यात लागू होणार नाही – मुख्यमंत्री

News Desk

इन्फ्लूएंझा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा दक्ष!– डॉ. तानाजी सावंत

Aprna