HW News Marathi
महाराष्ट्र

हिंदुस्थानी भाऊचं ‘ते’ चिथावणीखोर वक्तव्य नेमकं काय?

मुंबई | सोशल मीडियावरील स्टार हिंदुस्थानी भाऊ याने केलेल्या आवाहनानंतर राज्यातील विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. हिंदुस्थानी भाऊ अर्थात विकास पाठक याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यात त्याने दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या नाही तर राज्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तर त्याच्या या आवाहनानंतर राज्यातील विद्यार्थी खरोखरच रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले.

हिंदुस्थानी भाऊने २४ जानेवारी रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत दहावी-बारावीच्या परिक्षांबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना जर ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे, तर मग परीक्षा ऑफलाईन का?, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच कोरोनामुळे परिस्थिती गंभीर असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका, अशी विनंती देखील भाऊने सरकारला केली आहे.

या व्हिडिओमध्ये हिंदुस्थानी भाऊने आपल्या या व्हिडिओत विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. तसेच परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या किंवा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्या, अशी मागणी त्याने केली आहे. परीक्षा घेऊच नका, असं मी म्हणत नाही. मात्र, कोरोना महामारी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या, अथवा ऑनलाईन घ्याव्या, असे त्याने सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी माझ्या संपर्कात असून अनेकांना ऑनलाईन शिक्षण घेता आले नाही तर त्यांच्या या आवाहनाला विद्यार्थ्यांनीही प्रतिसाद देत राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक

swarit

“ओहोटी संपल्यानंतर भरती सुरु होते, वेलकम खडसे साहेब” –  रोहित पवार

News Desk

एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही! – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

Aprna